गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरेंनी आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाहीर सभा घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या या सभेला तुफान गर्दी झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. त्यामुळे आज राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करताच केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि पर्यायाने सरकारला त्यांनी झापलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात पाच वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुका होतील असं म्हणता म्हणता अजूनही होत नाहीत. यामुळे २०१९ ला ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर आज निवडणुका होत आहेत. आता आचारसंहितावाले जागे झाले आहेत. परंतु, मी बातमी वाचली की निवडणुकीसाठी महानगपालिकेच्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामाला जुंपलं आहे. डॉक्टर मतदारांच्या नाडी मोजणार की नर्सेस डायपर बदलणार?” असा खोचक सवाल राज ठाकरेंनी विचारला.

raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

हेही वाचा >> MNS Gudi Padwa Melava : “विधानसभेच्या तयारीला लागा”, राज ठाकरेंचे खास शैलीत आदेश; म्हणाले, “गावागावांतून आलेल्या…”

“ज्याच्यासाठी त्यांची नेमणूक केली आहे तिथे ते नसावेत का? निवडणुका होणार आहेत, हे निवडणूक आयोगाला माहित असतं ना? मग ते एक समांतर फळी का उभी करत नाहीत? शालेय शिक्षक, नर्सेस, डॉक्टर्स यांना हे उपद्व्याप का दिले जातात? या डॉक्टर आणि नर्सेसवर निवडणुकीची जबाबदारी टाकली असेल, तर त्यांनी तिथे जाऊ नये. जिथे रुग्णांसाठी तुम्ही आयुष्य घालवत आहात तिथे जा, तुम्हाला नोकरीवरून कोण काढतोय हेच बघतो”, असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही.” असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेणार का? या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “जागावाटपावरही चर्चा झाली. मी खरं सांगू का? मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेला बसलो होतो ते १९९५ ला. दोन तू घे, ही मला दे.. हे मला जमणार नाही. माझ्याकडून ते होणार नाही” असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

टोकाचा विरोध लाव रे तो व्हिडीओतून दिसला

राज ठाकरे पहिला माणूस होता ज्याने म्हटलं होतं की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यावेळी त्यांच्या पक्षातलंही कुणी याबद्दल बोललं नव्हतं. मी पाठिंबा दिला. २०१९ पर्यंत पाहिलं की ज्या गोष्टी झाल्या त्या मला पटल्या नाहीत. बुलेट ट्रेन, नोटबंदी सगळे निर्णय घेतले. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याचा मी विरोध दर्शवला. ज्या माणसावर सर्वात विश्वास असतो त्यावेळी विचार करत होतो की देशात अनेक गोष्टी घडू शकता. ज्यांच्यावर प्रेम आणि विश्वास असतो त्याला तडा जातोय हे दिसायला लागलं तेव्हा तो जो राग असतो तो राग आला. माझा राग तर टोकाचा आहे. महाराष्ट्रावर माझं प्रेम आहे ते टोकाचं प्रेम आहे. माझा टोकाचा विरोध लाव रे तो व्हिडीओतून तुम्हाला दिसला. असंही राज ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदींकडून मला खूप अपेक्षा आहेत

“नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत. आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला भारत देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी १० वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य हेच तरुण-तरुणी आहेत. प्रत्येक देशाचा एक काळ असतो. जपानमध्ये एक काळ होता. अनेक कंपन्या तिथे उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले. घुसळून निघाला तो देश, असा आपला देश घुसळून निघाला पाहिजे. तसं जर घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल, देशात अराजक येईल” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.