मुंबई-गोवा महामार्ग अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ काल पहाटे झालेल्या भीषण अपघातातील आणखी १४ मृत प्रवाशांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. या दुर्दैवी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे लालसिंग भंवरसिंग चौडावार (वय ३०, रा.मध्य प्रदेश), विजय विक्रम कुशवाह (वय २८, रा. उत्तर प्रदेश), रवी जगन्नाथ वाडेकर (वय २५, रा. विलेपार्ले), मॅन्युअल अरमेंडा पिंटो (वय ५२, रा. विलेपार्ले), सुरेश वसंत कांबळे (वय २५, रा. कामाठीपुरा, मुंबई), अजमेरअली जमेर मजुरी (वय २०, रा.बलरामपूर, उत्तर प्रदेश), रुदल भभुती भगत (वय २४, रा. दवरिया, उत्तर प्रदेश), प्लासेट इग्नोशियस (वय ७५, गोरेगांव), बर्नाड इग्नोशियस (वय ६५, गोरेगांव), बेंतो डिकोस्टा (वय ६८, रा. मडगांव, गोवा), क्लाडिन जॉन फर्नाडिस (वय ६०, रा. सांताक्रुझ), विवेक प्रकाश परवार (वय २४, रा. कोटोंबी चंदर कॅम्प, गोवा), पेट्रिक मेंडिस (वय २४, रा. पोंबुरा, बारदेश, गोवा), मिर्झा जावेद खरुल्ला बेग (वय ३७, रा. गावदेवी, डोंगरी)
यापैकी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रवाशांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले असून इतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.