येत्या २० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. उच्च न्यायालयाने अनेकवेळा फटकारल्यानंतर सीबीआयने सचिन अन्दुरे आणि शरद कळसकर या दोन संशयित मारेकऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर खटलादेखील सुरू आहे. असे असले तरी या खुनामागचे खरे सूत्रधार अजून फरारच आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, पण सूत्रधार कधी पकडणार ? असा सवाल महाराष्ट्र अंनिस मार्फत सरकारला विचारला आहे. याबाबत अंनिसने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये हे चारही खून एकाच सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. असं असताना शासन संघटनेविषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही, हे निषेधार्ह आहे, अशा शब्दांत अंनिसने निषेध व्यक्त केला आहे.

uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
dewendra fadanvis
आमचा प्रवक्ताही चर्चेत पाणी पाजेल…; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना…
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

डॉ. दाभोलकरांच्या संशयित मारेकऱ्यांचे त्यांच्याशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते. केवळ त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी त्यांना भडकावलं होतं, यातूनच हा खून झाल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे दाभोलकरांच्या खुनाला मारेकऱ्यांबरोबर नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची डोकी भडकवणारे सूत्रधारदेखील जबाबदार आहेत. जोपर्यंत हे सूत्रधार मोकाट आहेत, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. त्यामुळे आणखी वेळ न दवडता या सूत्रधारांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा अंनिसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

देशभर विविध कार्यक्रमाचं आयोजन

मागील चार वर्षांपासून ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ या संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट हा दाभोलकरांचा स्मृती दिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. यादिवशी झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश अशा पंधरापेक्षा अधिक राज्यांत विविध उपक्रम आयोजित केले जातात. या वर्षीही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

पुण्यातील कार्यक्रम

१६ ऑगस्ट : फोटो प्रदर्शन
नंदिनी जाधव यांनी गेल्या दहा वर्षात जटमुक्त केलेल्या २७५ पेक्षा अधिक महिलांच्या विषयी बातम्या आणि त्यांचे अनुभव यावर आधारित फोटो प्रदर्शन
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिरचे कलादालन, वेळ- सकाळी १० ते संध्याकाळी ८ पर्यंत
प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक आणि अंनिस महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार

१७ ऑगस्ट: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १२ पुस्तकांचे लोकार्पण
हस्ते- अच्युत गोडबोले
स्थळ- रिफॅक्टरी सभागृह, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे.
वेळ: सायंकाळी ५ ते ७

१८ ऑगस्ट: जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याविषयी चर्चासत्र
वेळ: सकाळी १.३० ते ५.३०
स्थळ: आय. एल. एस. विधी महाविद्यालय, लॉ कॉलेज रोड, पुणे.
प्रमुख उपस्थिती : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले आणि अॅड. अभय नेवगी.

१९ ऑगस्ट: अंनिसचा हास्य जागर
वेळ: संध्याकाळी ५ ते ७
स्थळ: साने गुरुजी स्मारक, (पत्ता: राष्ट्र सेवादल, मध्यवर्ती कार्यालय, दांडेकर पूलाच्या जवळ )

२० ऑगस्ट: कायदा प्रबोधन यात्रा प्रारंभ
वेळ: सकाळी ११ वाजता
स्थळ: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल

वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित समाजधारणेची सद्यस्थिती विषयावर चर्चासत्र
वेळ: संध्याकाळी पाच ते साडेसात
स्थळ: साने गुरुजी स्मारक, (राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय, दांडेकर पूलाच्या जवळ)
सहभाग: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, अलका धुपकर, प्रतिक सिन्हा (संपादक,अल्ट न्यूज), आशिष दिक्षित (संपादक, बीबीसी)

हिंदी अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन
या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तीन हिंदी भाषेतील पुस्तकांचे लोकार्पण केले जाईल.
प्रमुख उपस्थिती- डॉ.सुनीलकुमार लवटे

महाराष्ट्रभर कार्यक्रम

-पुण्यासह इतर सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी २० ऑगस्ट रोजी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ फेरी

  • डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्हिडीओ दाखवून त्याच्यावर चर्चा
  • अभिवादन सभा, स्मृतीजागर असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.