राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपात येणार? चंद्रकांत पाटील यांचं सूचक उत्तर

पाहा नक्की काय म्हणाले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष

माजी मुख्यमंत्री व भाजपाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे नेहमी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसतात. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या दिवशी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यातही त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. पण या पत्रकार परिषदेत त्यांनी एक खळबळजन विधान केलं. “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं नसतं, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तुम्हाला आज भाजपात दिसले असते”, असा दावा त्यांनी केला होता. त्याच मुद्द्यावर आज चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं.

“थोरातांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे आहेराचं पाकिट नसतानाही जेवणाच्या आशेने चोरून लग्नात जाण्यासारखं”

“महाविकास आघाडीची सत्ता नसती तर जयंत पाटील भाजपात येणार होते. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चादेखील झाली होती. जयंत पाटील यांना मी त्यांच्या इस्लामपुरात जाऊन उत्तर देणार आहे. त्यांच्याबाबत जी माझ्याकडे माहिती आहे, ती मी तिथेच जाऊन उघड करणार आहे. पुढचं सरकार आमचंच येणार असं जयंत पाटील सातत्याने म्हणत आहेत. कदाचित पुढील सरकारमध्येही मी मंत्री असेन असं त्यांना म्हणायचं असेल, असं राणे म्हणाले होते.

डॉ. शीतल आमटे आत्महत्या: तपासासाठी विशेष पथकाला पाचारण

आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एक पत्रकाराने त्यांना, जयंत पाटील खरंच भाजपामध्ये येणार आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सूचक उत्तर दिलं. “मी इतका सामान्य माणूस आहे की वरच्या स्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं”, असं उत्तर देऊन त्यांनी प्रश्नाला बगल दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp leader jayant patil to enter bjp chandrakant patil answers the question maharashtra politics vjb