scorecardresearch

Premium

अजित पवार यांचा थेट हल्ला; शरद पवारांनी आम्हाला गाफील ठेवले

शपथविधीपूर्वी आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वेळोवेळी पूर्वकल्पना दिली होती.

NCP National President and Deputy Chief Minister Ajit Pawar accused Sharad Pawar
अजित पवार यांचा थेट हल्ला; शरद पवारांनी आम्हाला गाफील ठेवले

कर्जत : शपथविधीपूर्वी आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वेळोवेळी पूर्वकल्पना दिली होती. मात्र त्यांनीच आम्हाला सातत्याने गाफील ठेवले, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादीच्या वैचारिक मंथन बैठकीत बोलताना अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना लक्ष्य केले. महायुतीत सहभागी होण्यापुर्वी पक्षाच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक झाली होती. यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सुप्रिया सुळे यांना बोलावून आम्ही तो निर्णय सांगितला. लोकशाहीत बहुमताचा आदर द्यावा लागतो असेही सांगितले. तेव्हा सात आठ दिवसांत शरद पवारांशी बोलून सांगते असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. निर्णय झाला नाही म्हणून आम्ही पुन्हा एकत्र बसलो अनिल देशमुख, जयंत पाटील पण होते. मग आम्ही शरद पवारांकडे गेलो. त्यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली . त्यांनी काय करता येईल ते बघू, असे सांगितले होते. मध्येच सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

bachchu kadu chandrashekhar bawankule
“भाजपा छोट्या पक्षांना वापरून फेकून देते”, बच्चू कडू-महादेव जानकरांच्या आरोपांना बावनकुळेंचं उत्तर; म्हणाले, “जाणीवपूर्वक…”
jitendra awhad dhananjay munde
“गद्दारी रक्तात असलेल्यांना…”, शरद पवारांपाठोपाठ आव्हाडांचीही धनंजय मुंडेंवर टीका; म्हणाले, “तुमची लायकी…”
Ajit pawar speech on CCTV Camera
“सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, तुमचं काही…”, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
Jitendra Awhad Slams Ajit Pawar
“काकांच्या मृत्यूची वाट पाहतोय, आज अजित पवारांनी हद्द पार केली, लाज वाटते…”; जितेंद्र आव्हाडांचा शाब्दिक प्रहार

हेही वाचा >>>साहित्य संमेलनातील अजित पवार यांच्या उपस्थितीस सकल मराठा आंदोलकांचा विरोध

२ मे ला शरद पवार यांच्या पुस्तक प्रकाशनाचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात कार्यक्रम झाला. तेव्हा शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. याची पूर्वकल्पना कोणालाच नव्हती. पवारांनी राजीनामा दिल्यावर सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदाची निवड करायची, असे ठरले होते. राजीनामा दिल्यावर पवार घरी गेले. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना राजीनामा मागे घ्यावा म्हणून चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन करण्याची सूचना केली. त्यानुसार काही ठराविक टाळकी तेथे ठाण मांडून बसली होती. जर राजीनामा द्यायचा नव्हता तर दिला तरी कशाला, असास सवाल अजित पवार यांनी केला. पक्षाच्या खासदार व आमदारांनी २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता तर मग १७ जुलैला आम्हाला का बोलावले? पहिले मंत्र्यांना बोलवले, नंतर आमदारांना बोलवले नंतर सगळं सुरळीत होणार आहे असे सांगत होते. त्यावेळीही गाफील ठेवले गेले. १२ ऑगस्टला उद्याोगपतींच्या घरी बैठकीसाठी बोलावले. निर्णय घ्यायचा नव्हता तर गाफील का ठेवले असा सवाल त्यांनी केला. .

महायुतीत सहभागी होण्यापुर्वी झालेल्या सर्व बैठकांमध्ये अनिल देशमुख हे होते. पण भाजपला देशमुख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशास विरोध केला होता. . मला मंत्रिपद मिळणार नसेल तर मी तुमच्या बरोबर का येऊ अशी भुमिका देशमुख यांनी घेतली.

भुजबळ यांच्याविरोधात निदर्शने

कर्जत शिबिरासाठी छगन भुजबळ दाखल झाले. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ यांच्या विरोधात घोषणबाजी केली.

तुम्हाला जे खाते हवे ते आम्ही देतो, पण आमच्याबरोबर या असा प्रस्ताव मला देण्यात आला. परंतु शरद पवार यांना सोडून मी कधीच जाणार नाही असे ठामपणे सांगितले.- अनिल देशमुखमाजी मंत्री (शरद पवार गट)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp national president and deputy chief minister ajit pawar accused sharad pawar amy

First published on: 02-12-2023 at 06:15 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×