एकमेकांना डसलो तरी फरक नाही पडणार, राष्ट्रवादीचा ‘युती’वर निशाणा

मित्रपक्ष म्हणजे सक्तीची युती की सत्तेसाठी युती… पर ये पब्लिक है, ये सब जानती है…, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने हे व्यंगचित्र रेखाटले आहे.

परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली.

शिवसेना- भाजपाच्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. मित्रपक्ष म्हणजे सक्तीची युती की सत्तेसाठी युती… पर ये पब्लिक है, ये सब जानती है…, असे म्हणत राष्ट्रवादीने एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. यात एकमेकांना डसलो तरी फरक नाही पडणार, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

परस्परांवर टोकाची टीका आणि स्वबळावर लढण्याची भीमगर्जना करूनही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे आणि शहा यांनी वरळी येथील पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली होती.

शिवसेना- भाजपाच्या युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने आता व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. मित्रपक्ष म्हणजे सक्तीची युती की सत्तेसाठी युती… पर ये पब्लिक है, ये सब जानती है…, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने हे व्यंगचित्र रेखाटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीही व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेना- भाजपा युतीवर टीका केली आहे. ४ वर्ष राजीनामे खिशात ठेवून पुन्हा सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेने युतीनंतरही भाजपावर टीका केली आहे. भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राइकच्या कारवाईचे श्रेय घेण्याचे काम भाजपाकडून होत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. शिवसेना- भाजपाची दोस्तीत कुस्ती, असे राष्ट्रवादीने दोन दिवसांपूर्वी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp post cartoon on twitter mocks shiv sena bjp alliance

ताज्या बातम्या