scorecardresearch

५४ पैकी १३ ठिकाणी ‘नोटा’ निर्णायक

गटामध्ये दोन अपक्ष उमेदवारांनीही पाचशेहून अधिक मते घेतली असून नोटाला ३४० मते पडल्याचे दिसले.

विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटा मते अधिक

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १३ जागांवर विजेत्या उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटा मते (वरीलपैकी कुणी नाही) अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी विजयात नोटा मतांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.

जिल्ह्यात तलवाडा विक्रमगड येथे सर्वात अटीतटीची लढत होऊन शिवसेनेच्या भारती कामडी (२,७४१) या अवघ्या सात मतांनी निवडून आल्या. अनुसूचित जमाती स्त्रियांकरिता राखीव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (२७३४), मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष (२३४४) आणि भारतीय जनता पार्टी (२४५१) उमेदवारांमध्ये चौरंगी व अटीतटीची लढत झाली. या

गटामध्ये दोन अपक्ष उमेदवारांनीही पाचशेहून अधिक मते घेतली असून नोटाला ३४० मते पडल्याचे दिसले. या गटामध्ये शिवसेनेचा उमेदवार अवघ्या सात मताने विजय झाला.

याच पद्धतीने धामणगाव, नंडोरे-देवखोप, चंद्रपाडा, खोडाळा, शिगावखुताड, तारापूर-अबीटघर, सरावली (डहाणू), न्याहाळे बुद्रुक, जामशेत, वणई व सूत्रकार येथे विजयी उमेदवार ठरवण्यास नोटा मते निर्णायक ठरली. जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी १०० पेक्षा कमी मताधिक्याने उमेदवार विजयी झाले असून इतर पाच ठिकाणी विजयी उमेदवारांचे मताधिक्य शंभर ते दोनशे मतांच्या मध्ये होते.

पालघर तालुक्यातील माहीम गटामध्ये ५,६६३ इतक्या मताधिक्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला तर डहाणू सायवन (४,७९१) व बऱ्हाणपूर गटामध्ये (४,३०९) मोठय़ा फरकाने उमेदवार विजयी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात २२ ठिकाणी विजयाचे मताधिक्य एक हजारपेक्षा कमी असल्याचे दिसून आले असून या ठिकाणी झालेल्या मतविभागणीचा विजयी उमेदवारांना लाभ झाल्याचे मतमोजणीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

कोणत्या गटात मताधिक्यापेक्षा अधिक नोटा ?

गट                      विजयी पक्ष       मताधिक्य      नोटा

तालवाडा                 शिवसेना              ७              ३४०

धामणगाव                अपक्ष                २७            ४६६

नंडोरे-देवखोप          भाजप                 ९४            ३५२

चंद्रपाडा                   अपक्ष                 १०६          १६५

खोडाळा                   भाजप                 १४२          २०४

शिगाव-खुताड          बविआ               १४२          ३६३

तारापूर                    शिवसेना             १६९          १९६

आबिटघर                राष्ट्रवादी            १८६          १८४

सरावली                   भाजप                 २२९          ३२७

जामशेत                   भाजप                ३६३          ४०२

वणई                         शिवसेना            ३६९          १४६

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nota play crucial role in 13 seats of zilla parishad in palghar zws