सांगली: लग्न जमवून देण्यासाठी नवर्‍या मुलाकडून दीड लाख रूपये उकळून फसवणूक केली असल्याची तक्रार नवविवाहित तरूणींने जत पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री दाखल केली आहे. याप्रकरणी तीन महिलांसह चारजणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्य असलेल्या शितल मनोहर बनकर (वय २२ मूळ गाव एकतुणी ता. पैठण) हीचे लग्न जमवून देतो असे सांगून मध्यस्ती करणार्‍या महिलांनी दोन तरूणांची छायाचित्रे दाखवली. या पैकी एका तरूण तानाजी शिंदे याच्याशी दि. १२ ऑगस्ट रोजी तिपेहळ्ळी ता. जत येथे लग्न झाले. मात्र, या बदल्यात तीन महिला व बेळंकी (ता.मिरज) एका व्यक्तीने पतीकडून दीड लाख रूपये घेतले आहेत.

two Children Drown While Swimming, Surya River, palghar taluka, One Rescued, two dead Body Found , two Children Drown in Surya River, palghar news, Drown news,
सूर्या नदीत दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्यात यश
Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई

आणखी वाचा-काँग्रेस गद्दार, तर भाजप महागद्दार- माजी मंत्री महादेव जानकर

लग्न जमवून देण्यासाठी कोणताही आर्थिक सौदा झालेला नसताना या चौघांनी पैसे उकळून फसवणूक केली असल्याची तक्रार नवविवाहिता बनकर हिने केली आहे. या तक्रारीवरून ममता पगारे, तिची मैत्रिण कुंदा दोन्ही (रा. कोपरगाव) आणि वाळवा येथील भाभी या तीन महिलासह धनाजी जाधव रा. बेळंकी या चौघाविरूध्द जत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.