scorecardresearch

रत्नागिरी शहरात शनिवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

पावसाळा लांबणीवर पडल्यास रत्नाागिरी शहराच्या पाणी पुरवठय़ात व्यत्यय येऊ नये म्हणून येत्या शनिवारपासून शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी : पावसाळा लांबणीवर पडल्यास रत्नाागिरी शहराच्या पाणी पुरवठय़ात व्यत्यय येऊ नये म्हणून येत्या शनिवारपासून शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार शहराचा खालचा भाग आणि वरचा भाग अशी विभागणी करण्यात आली असून वरच्या भागात शनिवारी, तर खालच्या भागात रविवारी मिळणार आहे. या पध्दतीने पुढील आठवडय़ात दिवसाआड पाणीपुरवठा चालू राहणार आहे .

रत्नागिरी शहराला शिळ धरण, पानवल धरण, नाचणे तलाव आणि मिरजोळे एमआयडीसीच्या धरणातून पाणी मिळते. परंतू नवीन नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर एमआयडीसीकडून पाणी घेणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान सध्या नाचणे तलाव आणि पानवल धरणातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठय़ाचा भार शिळ धरणावर आला आहे. बुधवारी या धरणात ०.५८९ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. या धरणातून प्रतिदिन २० एमएलटी पाणी शहरवासियांना दिले जाते. या हिशेबाने या धरणात ५ ते ६ जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाचे आगमन लांबल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती असल्याने शहराचे दोन भाग करून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांनी सांगितले. वाढलेल्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने पाणी पातळी कमी होत गेली आहे. मात्र एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार असला तरी तो पुरेसा आणि योग्य दाबाने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले .

 शहराच्या वरच्या भागातील शनिवारी पाणी पुरवठा होणारी लोकवस्ती पुढीलप्रमाणे — सन्मित्रनगर, आंबेशेत, लांबेचाळ, माळनाका, मारूती मंदिर, एस. व्ही. रोड, हिंदू कॉलनी, थिबा पॅलेस रोड, आनंदनगर, विश्वनगर, नूतननगर, अभ्युदयनगर, उद्य्मनगर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, रमेशनगर, छत्रपती नगर, सहकार नगर, विष्णूनगर, नवलाई नगर, चाररस्ता मजगांव रोड, स्टेट बँक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापूरकर कॉलनी, कोकणनगर (जुने), कोकणनगर (फेज क्र. ४) आणि किर्तीनगर .

 खालच्या भागातील रविवारी पाणीपुरवठा होणारी लोकवस्ती पुढीलप्रमाणे — राजिवडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलबाग, चवंडेवठार, घुडेवठार, खडपेवठार, मांडवी, रामआळी, मारूती आळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, जेल रोड परिसर, धनजी नाका, आठवडा बाजार, झाडगाव, टिळक आळी, शेरेनाका, तेली आळी, जोशी पाळंद, वरची आळी, खालची आळी, लघुउद्योग, मुरूगवाडा, मिरकरवाडा, राजवाडी, ८० फुटी हायवे परिसर, पेठकिल्ला, मांडवी, वरचा फगरवठार, पोलीस लाईन, तांबट आळी, भुवड आळी, आंबेकरवाडी, राहुल कॉलनी, फातिमा नगर, आझाद नगर आणि कुंभारवाडा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One day water supply saturday ratnagiri city rainy season ysh

ताज्या बातम्या