जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग यांच्या वतीने जलसंधारण पाणलोट विकास चळवळ कार्यक्रमांतर्गत, जनजागृती कार्यक्रमांतर्गत पाणलोट विषयाचे महत्त्व शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये पटविण्याकरिता प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर पाणलोट विषयावरील चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावरील बक्षीस निश्चिती करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे. अंकुश माने, अध्यक्ष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड. व्ही. एन. बेंदुगडे सदस्य, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, सौ. जे. एस. आंधळे, सदस्य, चित्रकला तज्ज्ञ.
जिल्हास्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील प्राथमिक व माध्यमिक गटातून काढण्यात आलेली चित्रे चित्रकला तज्ज्ञ सौ. जे. एस. आंधळे यांनी तपासली असून त्यातील सर्वात चांगली निवडक चित्रांची प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसाठी निवड केली आहे. प्राथमिक गटातून निवड झालेले स्पर्धक : प्रथम क्रमांक- कु. वैभव विजय बौद्ध, द्वितीय क्रमांक- कु. स्वरांगी विजय साळसकर, तृतीय क्रमांक- कु. आदिती किरण पाटील, सर्व इयत्ता- ३ री, आर.सी.एफ. प्राथमिक शाळा, कुरुळ.
माध्यमिक गटातून निवड झालेले स्पर्धक : प्रथम क्रमांक- कु. सायली अनंत वर्तक, इयत्ता- ९ वी , महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे, द्वितीय क्रमांक- कु. अनुजा रामचंद्र पाटील, इयत्ता ९ वी ब, को.ए.सो. जारह कन्याशाळा, अलिबाग, तृतीय क्रमांक- कु. साक्षी धनंजय घरत, इयत्ता- ९ वी अ, महात्मा गांधी विद्यालय, हाशिवरे.
या स्पर्धेमध्ये निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ  जिल्हाधिकारी, रायगड अलिबाग यांच्या हस्ते मंगळवार, १८ डिसेंबर, २०१२ रोजी, जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.