भारतात दसऱ्याला रावण दहनाची परंपरा आहे. देशभरात विविध ठिकाणी रावण दहनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पत्नीच्या छळाला कंटाळलेले काही पुरुष दसरा थोडया वेगळया पद्धतीने साजरा करतात. ही पुरुष मंडळी दसऱ्याला रावणाऐवजी त्याची बहिण शूर्पणखाचा पुतळा जाळतात.

अशा प्रकारे दसरा साजरा करणारे हे पुरुष पत्नी पीडित संघटनेचे सदस्य आहेत. गुरुवारी औरंगाबाद जिल्ह्यातील कारोली गावात त्यांनी शूर्पणखाचा पुतळा जाळला. भारतातील सर्व कायदे पुरुषांच्या विरोधात आणि महिलांना प्राधान्य देणारे आहेत. छोटया छोटया मुद्यावरुन नवरा आणि त्याच्या कुटुंबियांचा छळ करण्यासाठी महिला कायद्यातील तरतुदींचा वापर करतात असे पत्नी पीडित संघटनेचे संस्थापक भारत फुलारे यांनी सांगितले.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

पुरुषांवर होणाऱ्या या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. शूर्पणखाच्या पुतळयाचे दहन करुन आम्ही प्रतिकात्मक विरोध व्यक्त करत आहोत असे फुलारे यांनी सांगितले. २०१५ च्या नोंदीनुसार देशात जितक्या विवाहित व्यक्तींनी आत्महत्या केल्या त्यात ७४ टक्के पुरुष होते असा दावा फुलारे यांनी केला. काही सदस्यांनी सध्या सुरु असलेल्या #MeToo मोहिमेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.