केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ७० सीपी इंडेक्सवरील प्रदूषण अतिशय धोकादायक ठरविले आहे. प्रदूषणात देशात चौथ्या व सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या चंद्रपूरचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन ५४.४२ सीपी इंडेक्सवर आणण्यात स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाला यश आले आहे. तरीही महाऔष्णिक वीज केंद्र, कोळसा खाणी आणि सिमेंट व इतर उद्योगांमुळे चंद्रपुरात हवा, जल, ध्वनी आणि धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात आहे.

जिल्हय़ात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या ३० कोळसा खाणी, महाऔष्णिक वीज केंद्र, खासगी औष्णिक विद्युत केंद्र, बल्लारपूर पेपर मिल, पोलाद उद्योग, पाच सिमेंट कारखाने तसेच वाहतूक व्यवसाय व प्रदूषणात भर घालणारे असंख्य उद्योग आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार कुठल्याही शहराचा सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक हा ७० सीपी इंडेक्सच्या वर नको. तो आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानीकारक समजला जातो. मात्र २०१० च्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार चंद्रपूरचा सर्वसमावेशक पर्यावरण निर्देशांक तेव्हा ८३.९८ होता. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी चंद्रपूर देशात प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर होते. प्रदूषणाची ही आकडेवारी बघून तेव्हा खासदार हंसराज अहीर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे आणले होते. त्यानंतरच चंद्रपूरचा आराखडा तयार करण्यात आला. तो अतिशय कठोरपणे राबविण्यात आला. २०१३ मध्ये पुन्हा एकदा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वसमावेशक मूल्यांकन केले असता चंद्रपूरचा सीपी इंडेक्स ८१.९३ होता. यावेळी चंद्रपूर चौथ्या वरून देशात सहाव्या क्रमांकावर आले होते. प्रदूषणाची ही मात्रा कमी करण्यासाठी कठोर उपाय योजना करताना सर्वाधिक प्रदूषण करणारे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे २१० मेगाव्ॉटचे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचा दोन संच बंद करण्यात आले. विविध उपाययोजना करतानाच महाऔष्णिक विद्युत केंद्र तसेच वेकोलि, बिल्ट तसेच इतर उद्योगांतून नदी, नाले व तलावांत सोडण्यात येणारे विषारी पाणी सोडणे बंद करण्यात आले. त्याचा परिणाम जलप्रदूषणही कमी झाले. विशेष म्हणजे यानंतर २०१० पासून या जिल्हय़ात केंद्रीय प्रदूषण मंडळाले लावलेली उद्योगबंदी मागे घेण्यात आली. केंद्रीयमंत्री हंसराज अहीर व अर्थ, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे तसेच प्रदूषण कमी झाल्याने ही बंदी मागे घेण्यात आली. प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर शहराचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन ५४.४२ सीपी इंडेक्स आहे. याचाच अर्थ शहरातील प्रदूषण कमी झाले आहे.

mumbai ramabai ambedkar nagar zopu marathi news
रमाबाई आंबेडकर नगर पुर्नविकास : ‘झोपु’चे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात १६८४ रहिवाशांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणार
plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
sewage treatment plants for residential complexes from thermax
‘थरमॅक्स’कडून निवासी संकुलांसाठीही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; पुनर्वापरामुळे पाण्याची ८० टक्के बचत शक्य
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे नवीन ५०० मेगाव्ॉटचे दोन संच, धारीवाल पॉवर प्रोजेक्ट, अंबुजा, एसीसी, अल्टाटेक सिमेंट कारखाना, लॉईड मेटल्स, घुग्घुस, मल्टी ऑरगॅनिक, वेकोलिच्या कोळसा खाणी आदींमधून प्रदूषण सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संमतीपत्राच्या समितीने १० ऑक्टोबर २०१६ रोजीच्या बैठकीत ताडाळी ‘एमआयडीसी’मधील धारीवाल औष्णिक वीज प्रकल्पाला धुराचे नमूने तपासल्यानंतर अहवालात संमतीपत्र रद्द का करण्यात येऊ नये, या आशयाची नोटीस बजावली आहे.

वन्यजीवांवर परिणाम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या महाऔष्णिक विद्युत केंद्राचा वाघ, बिबटय़ासह इतर वन्यजीवांवर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रीन प्लॅनेट सोसायटीने राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे केली होती.

प्रदूषणाने विविध आजार

  • चंद्रपूर शहर प्रदूषणात देशात चौथ्या व सहाव्या क्रमांकावर होते, त्या वर्षी जिल्हय़ात प्रदूषणामुळे ४२० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाने घेतली होती.
  • केवळ मृत्यूच नाही तर १ लाख २६ हजार ३३८ लोकांना विविध आजाराने ग्रासले होते. यामध्ये हृदयरोग, त्वचारोग, कर्करोग, दमा, केस गळती, क्षयरोग यासोबतच पोटाचे विकास, किडनी आजार, मूत्रपिंड यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले.
  • विशेष म्हणजे तेव्हापासून जिल्हय़ात या आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येत आहेत. याला प्रदूषण हे एकमेव कारण असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
  • प्रदूषण मात्रेची मोजणी करणाऱ्या यंत्राची फिल्टर टेप तुटल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर शहर प्रदूषणात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवर घेतली गेली आहे.
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे हा सर्व प्रकार झाल्याची बाब उघड झाली आहे. मात्र मे महिन्याच्या अहवालानुसार चंद्रपूरचे प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या खाली आले आहे.