कराड: मराठा आंदोलकांवरील हल्ल्याची जबाबदारी घेत गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि विशेषतः राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध आपण करीत आहोत.

हेही वाचा >>> “सरकार मराठा आंदोलकांबरोबर, दोषी पोलिसांवर कारवाई करणार”, अजित पवारांची प्रतिक्रिया

no permission for fodder camps to curb corruption
यंदा चारा छावण्यांना परवानगी नाही; भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय? 
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप

मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिले असल्याचे कळते. या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे अशीही मागणी चव्हाण यांनी केली.

हेही वाचा >>> VIDEO : “…अन्यथा पोलिसांना बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं”, जालना घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने आतापर्यंत कायमच पोकळ घोषणा केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजप सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट करावे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांकडून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.