महाराष्ट्रात सध्या राजकीय आघाडीवर जे घडत आहे, त्याविरोधात काँग्रेसने आक्रमक व्हायला पाहिजे. पण, आमच्यात आपपसात मतभेद आहेत. आधी ही गटबाची संपुष्टात आणावी लागेल, असं विधान माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’ या कार्यक्रमात बोलत होते.

“राहुल गांधी यांनी वरिष्ठांना बाजूला करून तरुणांना संधी दिली. त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत. कारण, जुन्यांचा अनुभव आणि नव्यांचा उत्साह एकत्र करायला पाहिजे होते. पूर्वीच्या नेत्यांनी ते केले, परंतु आता राहुल गांधी यांनी फार आक्रमकपणे तरुणांकडे नेतृत्व दिले. ते यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

People decided to defeat Congress and now they will defeat Modi too says Congress leader Prithviraj Chavan
लोकांनी ठरवून काँग्रेसला पराभूत केले तसेच आता ते मोदींनाही पराभूत करतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास
Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”

“गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडाळीमुळे प्रादेशिक पातळीवरील दोन पक्ष कमकुवत झाले. यापुढील काळात महाराष्ट्रात द्विपक्ष पद्धत अस्तित्वात येईल. तशी राजकीय वाटचाल सुरु आहे. म्हणजेच काँग्रेस आणि भाजपा अशीच लढत होईल,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

“अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यातील सारीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. असे असताना अजित पवार मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांनी उपयुक्तता कमी झाली आहे. त्यामुळे भाजपा शिंदे यांच्याऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देऊ शकतो. वर्षभराच्या अंतरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडामुळे राज्याचे राजकीय चित्र बदलू लागले आहे,” असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.