नगर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमी वर शहरातील आयुर्वेद महाविद्यालयात हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामास आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते आज, सोमवारी सुरुवात करण्यात आली. येत्या दोन दिवसांत हा प्रकल्प  कार्यान्वित होऊन रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा केला जाईल, असे  आ. जगताप यांनी सांगितले.

आयुर्वेद महाविद्यालयात आ. संग्राम जगताप व जय आनंद फाउंडेशनच्या सहकार्यातून हवेतून प्राणवायू निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे संचालक डॉ. विजय भांडरी, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, नगरसेवक विपुल शेटीया, कमलेश भंडारी, शिवा कराळे, सनफार्मा कंपनीचे सरव्यवस्थापक अविनाश पापडे, वरिष्ठ व्यवस्थापक अतुल सुतार, अमोल धाडगे, घनश्याम सरडे, प्रवीण गाडेकर, रितेश परक, मिनेश छाजेड, वैभव मेहर, अमित वर्मा, प्रशांत मुथा आदी उपस्थित होते.