कर्जत : १९७२ पासून शासनातर्फे बांधण्यात आलेल्या विविध जलसाठय़ांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने राज्यातील जलसाठय़ांची दुरुस्ती करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. दरम्यान, कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठय़ांमधून पाण्याची गळती होऊन मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठय़ांना पुनस्र्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने कर्जत जामखेड तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

पावसाळा संपला, की सर्व बंधारे आटून जातात असं कर्जत जामखेड मतदारसंघातील गावकऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांचं सर्वेक्षण करून घेतले. त्यामध्ये गेल्या काही वर्षांत झालेली कामे ही कमी प्रतीची झाल्यामुळे जल साठय़ांमधून गळती होत होती असे निदर्शनास आले. त्यानंतर ही योजना कार्यान्वित करण्यासाठी लागणारे सर्वतोपरी प्रयत्न आ. रोहित पवार यांनी केले. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध बंधारे व पाझर तलावांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण ६९ जलसाठय़ांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. संबंधित जलसाठय़ांच्या दुरुस्ती कामासाठी आमदार रोहित पवार हे सतत पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून पाझर तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामासाठी एकूण ११ कोटी ७९ लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्ती कामामुळे पाण्याचा होणारा अपव्यय तर टाळता येईलच, शिवाय पाणीसाठय़ातही वाढ होईल.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Deputy Chief Minister Devendra Fadnavis challenges Uddhav Thackeray to show the good work he has done for Mumbai
मुंबईसाठी केलेले चांगले काम दाखवा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

‘कर्जत व जामखेडच्या जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी मी कायमच प्रयत्न करत असतो. ते यापुढेही करत राहीन. तसेच या योजनेसाठी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी मान्यता दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो’.

– आमदार रोहित पवार