scorecardresearch

Premium

“लोकसभेला माझा ताशा वाजेल”, राज ठाकरेंनी दंड थोपटले; म्हणाले, “काहीजणांच्या कानठळ्या…”

विधानसभा निवडणुकांचा निकाल म्हणजे लोकसभेची सेमीफायनल असल्याचं जाणकरांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Raj Thackeray
काळाचौकीतील कोकण महोत्सव येथे राज ठाकरेंंनी दिली भेट (प्रातिनिधिच छायाचित्र)

देशातील चार राज्यातील जनतेचा कौल आता स्पष्ट झाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणात मतमोजणी प्रक्रिया सुरू असली तरीही प्राथमिक अंदाजानुसार कोणी कोणत्या राज्यात मुसंडी मारली आहे याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दरम्यान, देशभर विधानसभा निवडणुकांची धामधुम असताना महाराष्ट्रात मात्र लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी देशभर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचा निकाल म्हणजे लोकसभेची सेमीफायनल असल्याचं जाणकरांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील काळाचौकी येथे कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाकरता राज ठाकरे आज काळाचौकीत गेले होते. तेथे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबतही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, चार-पाच राज्यांचे आजच निकाल आपल्यापर्यंत आलेले आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. (बाजूला वाजणाऱ्या ढोल-ताशांकडे इशारा करून) या ढोल ताशांपेक्षा जास्त ताशा माझा वाजला जाईल.

maval lok sabha seat
पिंपरी : मावळच्या जागेवरून महायुतीत पेच? राष्ट्रवादीच्या आमदारांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचाही मावळवर दावा
sunil tatkare criticized sharad pawar
‘महाराष्ट्रात अजित पवार पर्व सुरू’, शरद पवारांवर सुनील तटकरेंचा पलटवार
caste supremacy
काँग्रेसच्या चेहऱ्यावरील जातवर्चस्वाचा ओरखडा पुसण्याचा प्रयत्न
Sharad Pawar Slams Ajit Pawar
शेवटच्या निवडणुकीचं भावनिक आवाहन करणार का? अजित पवारांच्या विधानावर शरद पवार म्हणाले…

“काहीजणांना माझ्या ताशाच्या कानठळ्या बसतील, काही जणांना माझ्या ताशाच्या काठ्या बसतील. कल्पना नाही, पण जे काही बोलायचं आहे ते पुढल्या वर्षी बोलू”, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उमेदवार उभे करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी संयमाची भूमिका घेतली होती. लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात सभा गाजवल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात ते निवडणुकीत उतरले नव्हते. परंतु, यंदा ते चोख तयारीनिशी निवडणुकीत उभे राहणार असल्याचं म्हटलं जातंय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray big statement on loksabha election 2024 says he will be win victory sgk

First published on: 03-12-2023 at 21:14 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×