scorecardresearch

महाविकास आघाडीला मोठा धक्का; भाजपाचे धनंजय महाडिक विजयी, संजय पवार पराभूत!

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले असून धनंजय महाडिक विजयी झाले आहेत.

BJP-Shivsena

मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपाचे तीन सदस्य राज्यसभेवर निवडून गेले असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेला आहे. या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांची चाणक्यनीती यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

“कोल्हापूरचा पैलवानच भेट दिला”

शुक्रवारी सकाळपासून या मतदानाला सुरुवात झाली होती. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार या दोघांचा विजय होईल असा दावा केला जात होता. मात्र, मध्यरात्री झालेल्या मतमोजणीमध्ये संजय पवार यांना फक्त ३८ मतं मिळाली असून धनंजय महाडिकांना ४१ मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्कादायक पराभव मानला जात आहे. तिथे दुसरीकडे भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांची रणनीती कामी आल्याचं देखील बोलल जात आहे. “चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2022 at 08:07 IST
ताज्या बातम्या