सांगली : मराठा आरक्षण विषयक मुंबईत सर्वपक्षिय बैठकीत झालेल्या ठरावाची आज सांगलीत होळी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी या बैठकीमध्ये करण्यात आलेल्या ठरावाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत होळी करण्यात आली. या पुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाना पाठिंबा देण्यासाठी सांगलीतही साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षिय बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत फारसा विचार न होता, आंदोलन थोपविण्यावर विचार करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका न घेता आंदोलन थांबविण्यावर ठराव करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या बैठकीतील ठरावाची होळी करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, शंभूराज काटकर, रूपेश मोकाशी, यवुराज शिंदे, रेखा पाटील, विजय पवार, पृथ्वीराज पवार आदी उपस्थित होते.

Chandrahar Patil, case,
मविआ उमेदवार चंद्रहार पाटीलविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

आणखी वाचा-सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा स्थगित

राजकीय पक्षांच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा सामुहिक अंत्यविधी व पिंडदान आंदोलन करण्याच निर्णय यावेळी घेण्यात आला. शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी राममंदिर पासून सर्व राजकीय पक्षांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. अमरधाम स्मशानभूमीत दहन विधी होणार असून रविवारी रक्षा विसर्जन व सोमवारी पिंडदान आणि मंगळवारी उत्तरकार्य विधी असे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.