दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : बाजारात जाण्यासाठी तयार झालेल्या एक एकरातील द्राक्षांचा वटवाघळाच्या झुंडीने एका रात्रीत फडशा पाडल्याने मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील एका शेतकऱ्याचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांनी चार किलोला ५३० रुपये दर ठरवला असताना वटवाघळांनी बागच फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब व्हनमोरे यांनी सोमवारी द्राक्ष बागेची पाहणी करून हानीग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

लिंगणून तलावाजवळ शंकर माळी यांची एक एकर द्राक्ष बाग आहे. यासाठी सुमारे १३ लाखांचे विकास सोसायटीचे कर्जही काढले आहे. आरके जातीच्या या द्राक्षापासून चांगले उत्पन्न घ्यायचे या जिद्दीने शंकर माळी यांचे दोन चिरंजीव अवधूत व शिवदूत यांनी यंदा हंगामपूर्व फळछाटणी जूनमध्येच घेतली. लहरी हवामानात बाग टिकून राहण्यासाठी रात्रीचा दिवस करून बागेतील माल टिकवला. पावसातही फळ वाया जाऊ नये यासाठी दिवसा व रात्री औषध फवारणी करून माल वाया जाणार नाही याची दक्षता घेतली.

माल तयार झाल्यानंतर बाजारात पहिल्यांदाच माल येणार म्हणून व्यापाऱ्यांनीही या द्राक्षासाठी ५३० रुपये चार किलोसाठी देण्याची तयारी दर्शवली. दर निश्चिती झाल्यानंतर दिवाळीनंतर माल घेऊन जाण्याची तयारीही  दर्शवली होती. मात्र, हातातोंडाला आलेले द्राक्ष पीक एका रात्रीमध्ये वटवाघळाच्या झुंडीने फस्त केले आहे. काल सकाळी बागेत गेल्यानंतर द्राक्ष वेलीवर केवळ घडाच्या काडय़ा आणि बागेत द्राक्ष मण्यांचे अंथरूण पाहण्याची वेळ माळी बंधूवर आली. संपूर्ण बागच वटवाघळांनी रात्रीच्या वेळी फस्त केली असून वेलीला एकही घड शिक राहिलेला नाही.

जिल्हा बँकेचे संचालक व्हनमोरे यांनी आज  द्राक्ष बागेची पाहणी करून माळी बंधूंना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. बागेसाठी काढण्यात आलेल्या कर्जासाठी एकरकमी कर्जफेड योजनेतून काही सवलत देता येईल का, याबाबत विचार करण्यात येईल असे सांगितले. तसेच तहसीलदार दगडू कुंभार यांना दूरध्वनी वरून संपर्क साधून तातडीने पंचनामा करण्याची विनंतीही केली. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बागेची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षातील कामात सुसूत्रता येऊन गरीब रुग्णांना चांगली मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी बोलणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कार्यालयातील काम विस्कळीत झाले होते, परंतु आता जास्त नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. देवेंद्र फडणवीस</strong>, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेतून प्रतिरुग्ण सर्वाधिक मदत मिळाली. पोलिसांसह इतरांचेही आरोग्य शिबीर घेऊन लाभ दिला गेला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर करोनासह इतर अडचणींमुळे मर्यादा आली. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा  मदतीचा ओघ वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

डॉ. के. आर. सोनपुरे, माजी कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्ष, नागपूर.