scorecardresearch

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नादी लागून तू…”, राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांची खोचक टीका!

संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नादी लागून तू…”, राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाडांची खोचक टीका!
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि हिंदुत्व सोडल्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, अशी टीका राऊतांनी केली.

राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांचा शिवसेनेत प्रवेश होण्याआधीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, असं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी एकेरी उल्लेख करत संजय राऊतांवर टीकास्र सोडलं. बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गायकवाड यांनी ही टीका केली आहे.

हेही वाचा- “…तर तू फक्त आमदारच राहशील”; राजकारणात येण्यापूर्वीच शरद पवारांनी रोहित पवारांना केलं होतं सावध, ‘तो’ सल्ला आजही ठरतोय कानमंत्र!

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. महाराष्ट्रदेखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत आहे. शिवसेना आणि हिंदुत्व सोडलं म्हणून कौतुकाची थाप मारली, असं संजय राऊत म्हणतात. पण राऊतांच्या प्रवेशाच्या आधीपासून एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं स्थान आमच्या हृदयात आहे. त्यांच्या एक शब्दावर आम्ही जीवदेखील गहाण ठेवायला तयार व्हायचो. त्यांच्या नावावर आम्ही मरेपर्यंत भावुक होणार आहे.”

हेही वाचा- “…हे कितपत शहाणपणाचं आहे?” वाढदिवशी केलेल्या भाषणातून शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले, “आजपर्यंत…”

संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत गायकवाड पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नादी लागून तू बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शंभर टक्के संपवली. तूच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरेंचे विचार हिंदुत्वाचे होते. बाळासाहेबांचे विचार काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचे कधीच नव्हते. एकनाथ शिंदेंनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तुम्ही हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 20:31 IST

संबंधित बातम्या