लाचखोरीचा आरोप असलेल्या गजानन पाटील यांचा जामीन अर्ज बुधवारी सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. न्यायालायने पाटील यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गजानन पाटील यांच्या लाचखोरीचे प्रकरण चांगलेच गाजत असून त्यामुळे महसूल मंत्री एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत. गजानन पाटील यांच्यावर एकनाथ खडसे यांचे सचिव असल्याचे सांगत ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी गजानन पाटील आपले सचिव असल्याचे दावा फेटाळला होता. गजानन पाटील हे आपले सचिव नसले तरी त्यांना आपण चांगले ओळखतो. दरवर्षी पंढरपूरच्या वारीला ते बरोबर असतात, तसेच रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून प्रयत्न करीत असतात, असे खडसे यांनी स्पष्ट केले होते.
भाजप एकनाथ खडसेंच्या पाठीशी