पंजाब, हरियाणा येथील शेतकरी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा घेऊन निघाले आहेत. मात्र, त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जातायत. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे-पालघर विभागीय महिला अध्यक्ष ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या

हमी भावासाठी कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधल्या शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. दिल्लीच्या सीमेवर तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारून या शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलकांच्या हातात ‘शेतकऱ्यांवर गोळीबार, आता नाही सहन होणार’, ‘शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; जगाच्या पोशिंद्याला जगू द्या,’ अशी फलकं होती. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Thane Lok Sabha
कोणताही उमेदवार द्या पण, तो शिवसेनेचाच असावा; नवी मुंबईतील शिबिरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लावला सूर

पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ची हाक

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनीधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. सरकारने डाळी, मका आणि कापूस ही पिके पाच वर्षांच्या कालावधीसाठी किमान आधारभूत किमतींना (एमएसपी) खरेदी करण्याच्या प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मात्र शेतकऱ्यांनी सोमवारी फेटाळून लावला. यानंतर बुधवारी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ची हाक देण्यात आली आहे.