वाई: शरद पवार हे माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक आहेत म्हणूनच एवढ्या सभा सातारा लोकसभा मतदारसंघात घेत आहेत, अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पवारांवर केली आहे. मी नेहमी कॉलर उडवतो त्यांनी दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे. उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा असे संकेत पवारांनी दिले आहेत, असे सांगून उदयनराजे म्हणाले, वाईच्या सभेत ते कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ आहे हे बघावे लागते, अशी टीका केली होती.

उदयनराजे म्हणाले, मी नेहमीच कॉलर उडवतो. मी लोकांच्या हिताच्या विरोधात काहीही केले नाही. मी सकाळी दुपारी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर नाईट सूटमध्ये आणि रात्री झोपेतसुद्धा कॉलर उडवतो. शरद पवारांनी हे संकेत दिले आहेत की, त्यांनी दिलेला उमेदवार हा चुकीचा आहे. उदयनराजे हेच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा असे संकेत त्यांनी आपल्या भाषणात दिले आहेत. त्यामुळे माझ्या निवडणुकीचे मुख्य प्रचारक म्हणून एवढ्या सभा सातारा लोकसभा मतदारसंघात ते घेत आहेत. जेणेकरून जास्तीतजास्त मतांनी मी निवडून आलो पाहिजे, असे उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा – राधाकृष्ण विखे पाटलांचे शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “खुली चर्चा करण्याची…”

हेही वाचा – संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी ठाकरेंनी का नाकारली? ‘त्या’ ड्राफ्टमध्ये काय होतं? उदय सामंतांचा गौप्यस्फोट

यशवंतराव चव्हाण यांचे विचार म्हणजे यशवंत विचार हे लोक कल्याणचे होते. भ्रष्टाचाराच्या बाजूचे नव्हते. जे कोणी भ्रष्टाचाराचे समर्थन करत असतील त्यांचे यशवंत विचार असू शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे त्यांचे मानसपुत्र म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांना का सुचले नाही, असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजे म्हणाले, लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात मागणी करत आहेत. ज्यांनी माथाडींच्या जिवावर आजपर्यंत आणि राजकारण केले त्यांना त्यांचा विसर पडला आहे. माथाडी तरुण माता-भगिनी एकच विनंती आहे की माथाडीचे नेते नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांनासुद्धा शिशीकांत शिंदे यांनी माथाडीमधून बाजूला केले. त्यामुळे नरेंद्र पाटील आणि रमेश पाटील यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.