राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सध्या भाजपाने चांगलाच आक्रमक पवित्र घेतल्याचं दिसून येत आहे. या मागणीसाठी राज्यभरात पुणे, नाशिक, नागपूर अशा ठिकठिकाणी भाजपाची आंदोलनाला सुरुवात आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटरवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर करुन सरकारवर निशाणा साधला आहे आहे. “जनतेसाठी मंदिर बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का??”, असा सवाल नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

“भास्कर जाधवांच्या मुलाने कुठलं पुण्य केलंय?”

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये सरकारला अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडीओ शेअर करत आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात कि, “जनतेसाठी मंदिर बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का? फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का? यांनी कुठले पुण्य केले आहे?” त्याचसोबत आपल्या या ट्विटनंतर नितेश राणे यांनी देखील स्वतः एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात, “भास्कर जाधवांच्या मुलावर कारवाई करा अन्यथा मंदिरं उघडा. अन्यथा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मंदिरं उघडण्याचं काम आम्ही करू”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Nana patole on uddhav thackeray
“…तर उद्धव ठाकरेंसाठी मदतीला धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”; मोदींच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, “या जगात…”
abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”

…अन्यथा आम्ही मंदिरं उघडण्याचं काम करू!

नितेश राणे म्हणतात कि, “सत्ताधारी आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा मंदिरात अभिषेक करत असल्याचा व्हिडीओ मी पोस्ट केला आहे. एकीकडे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी मंदिरं बंद ठेवत आहे. करोना होईल अशी कारणं देत आहे. पण दुसरीकडे जर शिवसेनेच्याच आमदाराची मुलं मंदिरात बसून अभिषेक करत असतील तर मग सामान्य जनतेने काय नेमकी चूक केली? हे देखील या ठाकरे सरकारने आम्हाला सांगावं. एकतर भास्कर जाधव यांच्या मुलावर सरकारने कारवाई करावी किंवा सामान्य जनतेसाठी मंदिरं खुली करावीत. अन्यथा सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मंदिरं उघडण्याचं काम भाजपाच्यावतीने आम्ही स्वतः करू.”