इन्सुली येथील स्विनिंग मिल जमीन बिल्डर्सच्या घशात घातल्याने शेतकरी व गिरणी कामगारांवर अन्याय झाला असून त्या विरोधातील आंदोलनात्मक मोर्चा बुधवार, २० फेब्रुवारीला तहसील कार्यालयावर काढण्याचा निर्णय ठाम असल्याचे तहसीलदार विकास पाटील यांना संघर्ष समितीने दिला आहे.
इन्सुली सूत गिरणी प्रश्नावर इन्सुली गावाने आयोजित केलेल्या जनआंदोलनात गावासह जवळपासच्या जनतेचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सर्व जनतेने २० फेब्रुवारीला सकाळी १० वा. विश्रामगृहाजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष विकास केरकर, सरपंच नम्रता खानोलकर, पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी केले आहे.
तहसीलदार विकास पाटील यांनी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत विकी केरकर, गुरुनाथ पेडणेकर, नाना पेडणेकर, नारायण राणे, सचिन पालव, नलू मोरजकर, सरपंच नम्रता खानोलकर आदींनी म्हणणे मांडले.