तालुक्यातील नेरगाव शिवारात छापा टाकून पोलिसांनी घरगुती वापराचे ८२ सिलिंडर जप्त केले. हे सर्व सिलिंडर अनधिकृत असून त्यातील ३४ भरलेले तर उर्वरित ४८ रिकामे आढळले. बोलेरो जीप व दोन वीज पंप असा तब्बल चार लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. आहेर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद गढरी, हिरालाल बैरागी यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे धुळे-सुरत महामार्गावरील चेंदड भिलाटीजवळ ही कारवाई केली. सुमित उर्फ ढबूशेठ जयस्वाल (रा. नेर, धुळे) याने स्वत:च्या फायद्यासाठी इम्रानखान नवाबखान पठाण (३२गांधी चौक, नेर) व दादा उखा ठाकरे (३५, चेंदड भिलाडी) यांच्या मदतीने टँकरमधून घरगुती वापराचा गॅस काढून तो बेकायदेशीरपणे सिलिंडरमध्ये भरण्याचा आणि भरलेले सिलिंडर बेकायदेशीरपणे काळ्या बाजारात विकण्याचा व्यवसाय चालविला होता, अशी माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे. या कामासाठी संबंधितांकडून वापरली जाणारी बोलेरो जीप, विजेवर चालणारे दोन पंप, वजनकाटा, नोझल, चिमटे व नळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
टँकरमधून सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
तालुक्यातील नेरगाव शिवारात छापा टाकून पोलिसांनी घरगुती वापराचे ८२ सिलिंडर जप्त केले. हे सर्व सिलिंडर अनधिकृत असून त्यातील ३४ भरलेले तर उर्वरित ४८ रिकामे आढळले.
First published on: 19-12-2012 at 07:29 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanker to cylendar gas transferar gang arrested