जुन्नर तालुक्यातील आणे येथील अपंग कल्याण केंद्रातील १६ वर्षीय मुलीवर शिपाई  महादेव बोराडे याने बलात्कार केल्याची फिर्याद मंगळवारी नारायणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. बोराडे याने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दिलेल्या मुलींची संख्या आता तीन झाली आहे. दरम्यान, बोराडे याला पाठीशी घालणारा उपमुख्याध्यापक, तीन शिक्षक व दोन क्लार्क अशा एकूण सहा जणांनाही अटक झाली आहे.
बोराडे व प्राचार्य वसंत गिते हे यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्य़ात पोलीस कोठडीत होते. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत  करण्यात आली आहे. याप्रकरणी ६ एप्रिल रोजी १२ वर्षांच्या मुलीने पहिली तक्रार दाखल केली. दुसरी तक्रार १६ वर्षीय अपंग मुलीने तीनच दिवसांनी दिली आहे, तर मंगळवारी ६० टक्के अपंग असलेल्या १६ वर्षांच्या मुलीने शिपाई बोराडे याच्याविरुद्ध तिसरी तक्रार दिली.