सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले ग्रामपंचायतीमधील गाजत असणाऱ्या शौचालय घोटाळ्यात ग्रामसेवक व सरपंचाला लेखा परीक्षकांनी अहवालात दोषी धरले असल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या ग्रामपंचायतीत शौचालयासह विविध योजनांत ३५ लाख २९ हजार रुपयांची गडबड झाल्याची पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्य अशोक दळवी व राघोजी सावंत यांनी या प्रकरणी आवाज उठविला होता. त्यानंतर चौकशी झाली, पण गेल्या आठ महिन्यांत लेखापरीक्षण करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने वेर्ले गावच्या ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी उपोषणदेखील केले होते.

call, electricity bills, scam,
“बील न भरल्याने वीज पुरवठा खंडित केला जात आहे”, असा फोन आला तर विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते 
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 

कोकण आयुक्तांनी एक महिन्यापूर्वी वेर्ले ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून अपहाराची रक्कम आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याशिवाय पालकमंत्री दीपक केसरकर यांनीदेखील निर्देश दिले; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोकण आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी एक महिन्यानंतर केली. वेर्ले गावात शौचालय वाटप करताना खिरापत वाटतात तसा प्रकार करून शौचालयामागे ठरावीक रक्कम लाभार्थ्यांकडून घेण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. हा घोटाळा गाजत असतानाच कोकण आयुक्तापर्यंत तक्रार दाखल करण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या घोटाळ्यात सरपंच प्रमिला श्यामसुंदर मेस्त्री व ग्रामसेवक केतन दिगंबर जाधव यांच्याविरोधात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुजीत यरवळकर यांनी ३५ लाख २९ हजार ६०२ रुपयांच्या अनुदान अपहाराची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सन २०१४-१५ व ३१ मार्च २०१६ च्या लेखा परीक्षणानुसार अपहाराचा ठपका ठेवण्यात आला.

या प्रकरणी काही महत्त्वाचे अधिकारी व ग्रामपंचायतीमधील म्होरके सहीसलामत सुटल्यामुळे पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.