आपल्या भाषांतराच्या कौशल्याने पु.ल.देशपांडे यांचे साहित्य देशभरातील हिंदी भाषकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकारने प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांच्या कार्याची दखल घेतली आहे. केंद्र सरकारच्या मानव विकास संसाधन मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या हिंदी निदेशालयाच्यावतीने वेदालंकार त्यांना एक लाखाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषेतील साहित्य हिंदीमध्ये भाषांतरित केल्याबद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

जगद्गुरू तुकाराम महाराजांची संपूर्ण गाथा हिंदीमध्ये भाषांतरित केल्यानंतर आता माऊलींची ज्ञानेश्वरीदेखील हिंदी भाषिकांना वाचण्यासाठी लवकरच उपलब्ध व्हावी यासाठी प्राचार्य वेदालंकार सध्या काम करीत आहेत. पु.ल. देशपांडे यांच्या विविध पुस्तकातील प्रसिद्ध निबंधांचे प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. त्यामुळे हसवणूक, गणगोत, असा मी असामी आणि व्यक्ती आणि वल्लीमधील अनेक विनोदी घटना आणि व्यक्ती हिंदी भाषिकांना अनुभवता येणार आहेत. रावसाहेब ,चितळे गुरुजी या महराष्ट्राला ज्ञात असलेल्या व्यक्तिरेखा आता देशभरातील वाचकांच्या काळजात जागा मिळवणार आहेत. ‘पु. ल. देशपांडे के हास्य व्यंगात्मक लेख’ या शीर्षकाखाली कानपूरच्या विकास प्रकाशनाने प्राचार्य वेदालंकार यांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या हिंदी  निदेशालयाच्यावतीने हा महत्वपूर्ण सन्मान देऊन वेदालंकार यांचा गौरव करण्यात आला आहे.

pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
BJP manifesto does not mention job creation statehood for Kashmir
महागाई, एनआरसीबाबत भाजपचे मौन; रोजगारनिर्मिती, काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख नाही
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान

प्राचार्य डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी यापूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा, वारणेचा वाघ, वारणेच्या खोऱ्यात या तीन कादंबऱ्यासह वीस निवडक कथांचा हिंदी अनुवाद केला आहे. त्याचबरोबर मराठीतील संगीत नाटकांचे मानदंड मानल्या जाणाऱ्या संगीत सौभद्र, कट्यार काळजात घुसली आणि शारदा या तिन्ही संगीत नाटकांचेही हिंदी भाषांतर पूर्ण केले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी मोठ्या उमेदीने त्यांनी ज्ञानेश्वरीचे भाषांतर करण्याचे काम हाती घेतले आहे. भारत सरकारच्या पद्म पुरस्कारासाठी देखील नुकतेच त्यांचे नामांकन स्वीकारण्यात आले आहे.