आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच देशातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करतायत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३ मार्च) एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशासह राज्यात सत्ताधारी भाजपाविरोधात असंतोष आहे. भाजपाने यावेळी ईव्हीएममध्ये घोटाळा करून दाखवावाच. तसं केलं तर देशात असंतोषाची लाट येईल. देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असं ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

“तुम्ही ईव्हीएम घोटाळा करूनच बघा”

“आज शेतकरी, कामगार, विद्यार्थी आक्रोश करत आहेत. पण ईव्हीएममध्ये काय होणार? अशी भीती सर्वांनाच आहे. लोकांमध्ये सरकारविरोधात उघड रोष दिसतो. या वेळेला त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करण्याचा प्रयत्न केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ईव्हीएम घोटाळा करूनच बघा,” असं आव्हान ठाकरेंनी भाजपाला दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticizes narendra modi bjp over evm and upcoming loksabha election 2024 prd
First published on: 03-03-2024 at 20:54 IST