scorecardresearch

उमेश कोल्हे हत्याकांड : सातही आरोपी ‘एनआयए’च्या ताब्यात

येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना औपचारिक प्रक्रियेनंतर आज सोमवारी रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले.

NIA
(प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना औपचारिक प्रक्रियेनंतर आज सोमवारी रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार इरफान खान याचाही समावेश आहे.

या आरोपींना ८ जुलैपूर्वी ‘एनआयए’च्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. ‘एनआयए’ने या सर्व आरोपींना आपल्या ताब्यात देण्याची विनंती न्यायालयात केली. त्यानंतर रात्री औपचारिक प्रक्रिया पूर्ण करून सर्व आरोपींना ‘एनआयए’च्या ताब्यात देण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umesh kolhe murder seven accused nia custody murder case arrested ysh

ताज्या बातम्या