वसई-विरार शहरात शुक्रवारी तब्बल ७७ करोनाबाधीत रुग्ण आढळून आले तर २ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहराील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ हजार ५१ एवढी झाली आहे.

दिवसभरात महापालिका हददीत ७६ तर ग्रामीण भागात १ रुग्ण आढळला. त्यात सर्वाधिक म्हणजे ४० रुग्ण नालासोपारा येथे आढळले आहेत. विरारमध्ये १८, वसईत १० आणि नायगावमध्ये ८ रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागातील कळंब गावात १ रुग्ण आढळला आहे. शुक्रवारी २ रुग्णांचा मृत्यू झाला तर ३५ जण करोनामुक्त झाले. यामुळे एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार ५१ झाली आहे.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील ४४ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय हॉटेल कर्मचारी, २ बस चालक, १ पोलीस, २ बॅंक कर्मचारी, १ परिचारिका, १ टॅक्सीचालक आदींचा करोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.