रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षकांची संख्या अधिक असल्याने विदर्भातील अशा शिक्षकांना मुंबई-नाशिककडे स्थलांतर करण्याची आपत्ती असल्याचे समायोजन प्रक्रियेतून स्पष्ट झाले. सध्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची राज्यव्यापी प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी रात्रीअखेर एक प्राथमिक चित्र स्पष्ट झाले. राज्यभरात एकूण ७ ते ८ हजार शिक्षक अतिरिक्त ठरत असून तेवढय़ा जागा रिक्त असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, अतिरिक्त शिक्षक व रिक्त जागा समसमान असल्याचे सांगितल्या जात असले तरी विभाग निहाय हे प्रमाण अत्यंत व्यस्त असल्याचेही स्पष्ट होते.
प्राथमिक आकडेवारीनुसार विदर्भातील अकराही जिल्ह्य़ांत नऊशेवर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या दीडहजारावर पोहोचते. म्हणजेच सहाशे ते सातशे शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहे. वर्धेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्य़ात २०७ शिक्षक अतिरिक्त असून रिक्त जागा केवळ ४६ आहेत. याचाच अर्थ उर्वरितांना जिल्हा सोडावा लागेल. तर अमरावती जिल्ह्य़ात रिक्त जागा ३०६ तर अतिरिक्त शिक्षक केवळ १९५ आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या तुलनेत रिक्त जागा अधिक असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये वाशीम, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्य़ांचा समावेश होतो. अर्थात अधिकांश जिल्ह्य़ांत अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचे विदर्भात समायोजन होणे शक्य नाही.
या तुलनेत विदर्भाबाहेर रिक्त जागा असलेल्या जिल्ह्य़ांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकटय़ा नाशिक जिल्ह्य़ात रिक्त जागा सहाशेवर असून अतिरिक्त शिक्षक केवळ ९२ आहेत. कोल्हापूर ५७०, औरंगाबाद ३४२, जळगाव २६८, उस्मानाबाद ७०, नगर ५०९, पालघर २०७ या जिल्ह्य़ांत रिक्त जागांचे प्रमाण सर्वाधिक आहेत. सांगली जिल्ह्य़ात ३३४ जागा रिक्त असून एकही शिक्षक अतिरिक्त नाही. हिंगोली, रायगड, ठाणे व पुणे येथील प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र, शिक्षण विभागाने या संदर्भात प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, सध्या जिल्ह्य़ात समायोजन होऊ न शकणाऱ्या शिक्षकांना पुढील निर्णयापर्यंत त्याच जिल्ह्य़ात ठेवले जाईल, त्यांना वेतनही मिळेल. प्राप्त माहितीनुसार मूळात ही समायोजनाची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण न झाल्याचा दावा करीत काही संस्थाचालक संघटना न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहेत.

विदर्भात रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षक अधिक असण्याच्या पाश्र्वभूमीवर राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले, विभागनिहाय व्यस्त प्रमाण आहे. पण मुंबई-नाशिक या परिसरात रिक्त जागांची संख्या अधिक असल्याने या जागांवर निश्चितपणे समायोजन होईल.

Nashik, literacy test, students,
नाशिक : केंद्रपुरस्कृत साक्षरता परीक्षेत जिल्ह्यातील २४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण
Delayed Salaries, Delayed Salaries of Technical School Staff , Delayed Salaries of Technical School teachers, Directorate of Technical Education in Maharashtra, Prompting Financial Crisis, Mumbai news, Maharashtra news, delayes salary of teachers, marathi news, salry news,
तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन रखडले
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?