लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या जोरात सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. या सभेत बोलताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. आता या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“दाढीवाल्यांचा चमत्कार उद्धव ठाकरे यांनी पाहिला आहे. त्यामुळे एखाद्याने आपल्यावर केलेला आघात आणि त्यापासून होणारा त्रास, या तणावातून ते टीका करतात. मात्र, एक लक्षात ठेवा. जे जे दाढीवाले असतात ते योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करतात. हे आपण पाहिले आहे. त्यामुळे दाढीवाल्यांच्या नादी लागू नका. आता जे बिना दाढ़ी वाले आहेत, त्यांना संभाळावं”, अशा खोचक शब्दात संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Ganesh Naik
“प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण देवेंद्र फडणवीसच…”, आमदार गणेश नाईक यांचं विधान; म्हणाले, “मी ओपन बोलतो”
Chief Minister Eknath Shinde candid speech Shrikant Shinde is responsible for party organization
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती; श्रीकांत शिंदेंकडे पक्ष संघटनेची जबाबदारी
Dr Srikant Shinde as group leader of Shiv Sena
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी
Ashok Gehlot, pm narendra modi,
पंतप्रधान मोदींच्या नावावर भाजपला स्पष्ट बहुमत नाही, आता मोदींनी…; अशोक गहलोत यांची जोरदार टीका
narendra modi
वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन; म्हणाले, “त्याग, शौर्य आणि अन्…”
ajit pawar
पुणे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी पैसे खाल्ल्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप; अजित पवार म्हणाले, “उचचली जीभ अन्…”
cm ekanath shinde inquired earnestly about the health of MLA P N Patil
मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस
ramdas athawale Yogi Adityanath 1
“रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…”

हेही वाचा : दोन पक्ष संपण्याच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला टोला; म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना म्हटलं होतं की, “बाप बदलण्याची महायुतीला गरज आहे. मला नाही”. यावर आता शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न शरद पवार यांना विचाराला पाहिजे. उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी शरद पवारांना नम्रपणे हात जोडले आहेत. यावर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी कार्टून कसे काढले असते? याचा विचार केला तर सर्वांच्या लक्षात येईल”, असा हल्लाबोल शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यामध्ये नेहमी आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. आता संजय राऊतांनी महायुतीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय शिरसाटांनी हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “संजय राऊत जेव्हा-जेव्हा भाकीतं करतात. तेव्हा त्या उलट होतं. त्याचा अर्थ समजून घ्या. ठाकरे गटाचे कोण-कोण नेते तुरुंगात जातील, याची यादी कदाचीत संजय राऊत यांच्याकडे आली असेल. पण त्यांचे नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले असावे. जेलचे दरवाजे ठाकरे गटासाठी उघडे झाले असून आता त्यांची जाण्याची वेळ आली आहे”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.