दक्षिणकडे जात असलेल्या एका मालगाडीचे दोन डब्बे रविवारी सायंकाळी 6 वाजता रूळावरून उतरले. रेल्वेगाडयांचे आवागमन बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे विभागाने युध्दस्तरावर दुरस्तीचे काम सुरू केले आहे. रात्री वृत्त लिहेस्तोवर काम सुरूच होते.

लॉकडाउनमुळे रेल्वे विभागाच्यावतीने मालगाडयांमधून मोठ्याप्रमाणावर साहित्याची ने आण करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी आठ डब्ब्याची मालगाडी वर्धा रेल्वेस्थानकावरून निघाली. बजाज चौकातील ओव्हर ब्रीज पार करताच रेल्वेच्या पाच व सहा नंबरच्या  094415 व 0933313 क्रमांकाचे दोन डब्बे रूळावरून घसरले. 5 नंबरच्या डब्ब्याचे एक चाक व एक स्प्रिंग तुटल्याने हा आपघात झाल्याची माहिती आहे. ही ट्रेन बल्लरशाहकडे  चालेली ही ट्रेन संथ गतीने निघाली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मोठे वळण असल्याने गती आणखी कमी करण्यात आली. यामुळे मोठा अपघात टळला. ही मालगाडी चवथ्या लाईनने जात असल्याने अप-डाऊन यामुख्य लाईनवर कोणताही प्रभाव पडला नाही.