रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे लघू पाटबंधारे विभागाच्या २८ पकी १८ धरणे पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागली आहेत. या सर्व धरणांमध्ये एकूण ७९.६१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

रायगड जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा समाधानी आहे. धरणांमधील पाणीसाठादेखील वाढला आहे. १८ धरणे १०० टक्के भरली आहेत. १ धरण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. गेल्या वर्षी जुल महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात १४ धरणे १०० टक्के भरली होती.

फणसाड, वावा, सुतारवाडी, कोंडगाव, घोटावडे, कवेळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरंध, िखडवाडी, कोथुर्डे, खैरे, मिलवले, कलोते-मोकाशी, दोनवत, मोरबे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

रायगड जिल्ह्य़ात सोमवारी सकाळपर्यंत ३४.६८ मिमीच्या सरासरीने ५५४.८० मिमी पावसाची नोंद झाली. १ जूनपासून ११ जुलपर्यंत २०९२०.८० मिमी पाऊस पडला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या ४२.२५ टक्के पाऊस झाला आहे.

पडलेला पाऊस

अलिबाग ६.०० मिमी., पेण २४.०० मुरुड  ७.००, पनवेल १८.००, उरण ४.००, कर्जत २४.००, खालापूर ७०.८०, माणगांव ३३.००, रोहा ३५.००, सुधागड ३८.००, तळा ५१.००, महाड ४२.००, पोलादपूर ७५.००, म्हसळा १६.००, श्रीवर्धन ३०.००, माथेरान ८०.०० मिमी. एकूण ५५४.८०, सरासरी ३४.६८ मिमी.