आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं आहे. सगळ्यांनीच आमच्या निर्णयांचा सन्मा केला आहे. आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण मागतो आहे. मराठा म्हणून आरक्षण दिलं गेलं तर ते टिकणार नाही. आम्ही ओबीसीतूच आरक्षण घेणार अशी गर्जना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

आगरी कोळी समाजाचा आमच्या आरक्षणाला किंवा आम्हाला विरोध नाही. येवल्यात बसलेले भुजबळ आणि एक-दोन जण राजकीय स्वार्थासाठी आवई उठवत आहेत. भुजबळ आणि त्यांचे एक-दोन जण बोलत आहेत म्हणजे समाज नाही. छगन भुजबळ राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला आरक्षण देणार यावर आमचा ठाम विश्वास आहे. यापुढेही जाऊन सांगतो मराठवाड्यात वेग वाढवणं गरजेचं आहे, तिथे नोंदी सापडायला अडचणी येत आहेत. २४ डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण हवं आहे आणि आम्ही ते आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Jitendra Awhad sunil tatkare
“…म्हणून शरद पवार तुम्हाला भाजपाशी चर्चा करायला सांगायचे”, जितेंद्र आव्हाडांचा तटकरेंना टोला
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
mp krupal tumane latest marathi news, mp krupal tumane cm eknath shinde latest marathi news
मुख्यमंत्र्यांसमोर रामटेकवरून भाजपविरोधी खदखद

हैदराबादला जी समिती गेली, ती चांगलं काम करीत आहेत. त्याबद्दल दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देणार याचा ठाम विश्वास आहे. नोंदी तपासण्यासाठी मराठवाड्यात मनुष्यबळ वाढवणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. २४ डिसेंबरच्या आत मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळवणार आहे. आत्तापर्यंत ३५ लाख नोंदी मिळाल्या आहेत असंही कळतं आहे. मात्र हे मला मीडियाच्या माध्यमातून समजलं आहे असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

समितीतल्या सदस्यांनी राजीनामा का दिला? हे मला माहीत नाही. फक्त आमचा एकच म्हणणं आहे, मागासवर्ग आयोगाने सुद्धा तातडीने काम करणे गरजेचे आहे. आणि ते त्यांनी केल पाहिजे समितीने आदेश दिले तशा नोंदी मिळाल्या आहेत. असंही जरांगे पाटील म्हणाले. आज यवतमाळमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.