“ज्यावेळी महाराष्ट्रात गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? तेव्हा का नाही केलात बंद? हा केवळ चौकश्यांवरुन महाराष्ट्राचे लक्ष विचलित करण्याचा नियोजित कार्यक्रम आहे.” असा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर केला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

याबाबत बोलातना प्रवीण दरेकर म्हणाले, “ज्यावेळी नागपुरला गोवारी हत्याकांड झालं, त्यावेळी सरकार कोणाचं होतं? त्यावेळी संप केला का? मावळला ज्यावेळी भयानक क्रूर पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून गोळीबार शेतकऱ्यांवर केला, त्यावेळा आपल्या संवेदना भावना कुठं होत्या? पालघरला साधुंचं हत्याकांड झालं, त्यावेळी दोन शब्दांचा आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला नाही, संप केला नाही, त्यावेळी आपल्या संवेदना कुठं होत्या? टीव्ही -9 शी ते बोलत होते.

पीक विमा मिळत नसल्याने शेतकरी टाहो फोडतोय –

तसेच, “आज महाराष्ट्र पूर्णपणे अतिवृष्टीने उध्वस्त झालेला आहे. तौक्ते वादाळाने कोकणात तर, नंतर पश्चिम महाराष्ट्रात नुकसान झाल्यानंतर मागील पंधरा दिवसापासून विदर्भ, मराठवाडा संपूर्णपणे उजाड झाला आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्या शेतकऱ्याला आधआर देण्यासाठी मुख्यमंत्री सोडाच, साधे पालकमंत्री तरी गेले आहेत का? एक रुपयाची मदत देखील त्या उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला केलेली नाही. त्याला पीक विमा मिळत नसल्याने तो टाहो फोडतोय, त्याच्या पिण्याच्या पाण्यासह शेत पंपाचं कनेक्शन आपण कापत आहात, कर्जाबाजारी शेतकरी झाला आहे.” असंही यावेळी दरेकर यांनी बोलून दाखवलं.

जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा नियोजित कार्यक्रम –

याचबरोबर, “खरच जर शेतकऱ्यांबद्दल आपल्याला संवेदना असती, तर शेतकऱ्याला आधार दिला असता. परंतु, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण तुम्हाला करायचं आहे आणि तो शेतकऱ्याचा आक्रोश, तो शेतकऱ्याचा संताप आज महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भामध्ये दिसतोय. त्यामधून सरकारबद्दल जे काही नकारात्मक वातावरण तयार झालेलं आहे. विविध प्रकारच्या चौकशा महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी हा नियोजित कार्यक्रम आहे.” असा आरोप दरेकर यांनी यावेळी महाविकासआघाडीवर केला.

पब्लिक है ये सब जानती है… –

“महाराष्ट्रात आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना कधी कॅबिनेटमध्ये श्रद्धांजली अपर्ण केली आहे का? आज महिलांवर भयानक अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल संवदेना व्यक्त केल्या का? लखीमपूरला घटना झाला ती दुर्दैवीच आहे, पण तिचं राजकारण इथं करायचं, हे महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर पब्लिक सब जानती है… खरं काय खोटं काय.. जनतेने जिल्हापरिषद निवडणुकीत दाखवून दिलं आहे. ” असं दरेकर यांना यावेळी सांगितलं.