scorecardresearch

Premium

शेतकरी प्रश्न, आरक्षण अन् कायदा सुव्यवस्थेवरून अधिवेशन गाजणार; विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार याची माहिती दिली.

Vijay Wadettivar
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून (७ डिसेंबर) नागपूरच्या विधानभवनात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार राज्य सरकारकडून आज विरोधी पक्षातील नेत्यांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी नेहमीप्रामणे बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीतर्फे आज (६ डिसेंबर) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन काळात कोणते मुद्दे ठेवणार याविषयी माहिती दिली.

“विदर्भात अधिवेशन होत असताना विदर्भाचा सुपूत्र म्हणून मी आपल्या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देईन. महिला, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनात प्रयत्न करेन. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळावं, या राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. यासाठी राज्यापुढील प्रश्न मोठे असताना चहापानाला जाणं उचित नाही, म्हणून आम्ही चहापानाला बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता”, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

state information commission
UPSC-MPSC : राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याद्वारे करण्यात आली? त्याची रचना, अधिकार आणि कार्ये कोणती?
Raj Thackeray Maratha Reservation
“मराठा समाजाला झुलवलं जातंय” आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका; विशेष अधिवेशनाबद्दल म्हणाले…
Recommending a comprehensive law relating to marriages with non resident Indians
अनिवासी भारतीयांबरोबर विवाहांसंबंधी सर्वंकष कायद्याची शिफारस
bombay hc asks maharashtra government on tarapur nuclear project rehabilitation issue
तारापूर प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न; पुनर्वसनाचा धोरणात्मक निर्णय कधी ? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ नागपुरात आलेलं आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष यावेळी उपस्थित आहेत. खरंतर, पुरोगामी महाराष्ट्राची अशी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रात पक्ष फोडून वेगवेगळ्या पक्षाचे सरकार सत्तेत आलेलं आहे. २०२२ वर्षांतील सर्वाधिक गुन्हे नोंदल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर दंगलीचं प्रमाण वाढलं. नागपुरात अधिवेशन होतंय, या उपराजधानीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. नागपूरची ओळख चोरांची नगरी म्हणून झाली आहे. याचा अर्थ या राज्याची सरकार सत्तेत आल्यापासून राज्यामध्ये शांतता भंग मोठ्या प्रमाणात होतंय असं दिसतंय. महाराष्ट्राची ही ओळख असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येईल? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गरिबी, बेरोजगारीमुळे राज्यात जगणं कठीण झालंय. त्यामुळे आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे. दर एक तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार शासन आपल्या दारी मोठा इव्हेंट होताना दिसतोय. बीडमध्ये दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबडरे मोडले असताना करोडो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. इव्हेंट करून बॅनर, हार तुरे लावले, याची लाजतरी वाटली पाहिजे. शेतकऱ्यांप्रती कणव नाही, हे यातून दिसून आलेलं आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारचे प्रश्न मोठे आहेत, परंतु अधिवेशाचा कालावधी कमी आहे, त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असंही ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Winter session of maharashtra assembly opposition leaders boycott on tea program sgk

First published on: 06-12-2023 at 15:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×