सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. येथे कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. इतकंच नाही तर येथे सतत नवनवीन ट्रेण्ड्सही येत असतात. या नवा ट्रेण्डची चर्चा सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत होत असते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर किकी चॅलेंजचं क्रेझ पाहायला मिळाला होतं. त्यानंतर आता 10 Year Challenge’ (१० इअर चॅलेंज) हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या हॅशटॅगअंतर्गंत आपले आताचे आणि १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करायचा असतो. या नव्या हॅशटॅगची भुरळ सेलिब्रिटींनाही पडली असून काही मराठी कलाकारांनी त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

काही दिवसापूर्वी बॉलिवूडमधील कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारत त्यांचे फोटो शेअर केले होते. या कलाकारांनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील त्यांचे फोटो शेअर केले आहेत. अमेय वाघ, सुयश टिळक, अमृता खानविलकर, इशा केसकर, रूपाली भोसले यांसारख्या अनेक कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारत या ट्रेंण्डचं स्वागत केलं आहे. तर चला पाहुयात त्यांचे काही फोटो. –

१. अमृता खानविलकर – मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर तिचा आताचा आणि दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमृताने नटरंग चित्रपटातील ‘वाजले की बारा’ या गाण्यातील फोटो आणि तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘…आणि काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटातील फोटो शेअर केला आहे.

२. अमेय वाघ-

मराठी चित्रपट, वेबसीरिजमध्ये झळकणाऱ्या अमेय वाघनेदेखील त्याचा १० वर्ष जुना फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या दहा वर्षांमध्ये त्याच्यात फारसा बदल झालेला नाही.

३.रुपाली भोसले-

अभिनेत्री रुपाली भोसलेने २००९ आणि २०१९ या कालावधीमधील २ फोटो शेअर केले आहेत. रुपालीने शेअर केलेल्या फोटोमधून तिच्यात कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्वीपेक्षा आता रुपाली अधिकच सुंदर आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

४. सुयश टिळक –

चित्रपटांपेक्षा रंगमंचावर जास्त वावर असणारा सुयश टिळक  का रे दुरावा या मालिकेतून घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याची लोकप्रियता कमालीची वाढली. सुयशने शेअर केलेल्या फोटोमध्ये फारसा काही फरक जाणवत नसला तरी त्याच्या आत्मविश्वासात कमालीचा फरक जाणवत आहे.