जॉर्ज आर. आर. मार्टिन यांच्या ‘अ साँग्स ऑफ आइस अँड फायर’ या कादंबरीवर आधारलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचे क्रेझ सध्या जगभरात पाहायला मिळते. याला बॉलिवूड कलादेखील अपवाद नाहीत. आता ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे क्रेझ ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाच्या कलाकारांवर पाहायला मिळते.

अभिनेता अक्षय कुमारने ‘हाऊसफुल ४ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमारसह अभिनेता रितेश देशमुख, क्रिती सेनन, पूजा हेगडे, बॉबी देओल आणि क्रिती खरबंदा दिसत आहेत. तसेच हे सर्व कलाकार एका खूर्चीत बसले असून त्या खूर्ची भोवती मानवी कवट्या दिसत आहेत. या फोटोवरून ‘हाऊसफुल ४’ हा विनोदी भयपट असल्याचे म्हटले जात आहे.

‘हाऊसफूल ऑफ थ्रोन. कोण जगणार कोण मरणार…चित्रपटाची कथाच ठरवणार’ असे अक्षयने फोटो पोस्ट करताना कॅप्शन दिले होते. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद समजी करणार असून चित्रपटाची निर्मीती साजिद नाडियाडवाला करणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकारांव्यतिरिक्त अभिनेता राणा डग्गुबती, चंकी पांडे, रंजीत, बोमन इराणी, जॉनी लिव्हर, जेमी लिव्हर, प्रदीप रावत आणि सौरभ शुक्ला हे कलाकार देखील झळकणार आहेत. तसेच हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.