नुकताच 66 वा फिल्म फेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिला बेस्ट फिमेल डेब्यूचा अवॉर्ड देण्यात आला आहे. ‘जवानी जानेमन’ या सिनेमासाठी तिला हा अवॉर्ड देण्याात आला. या सिनेमात अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. मात्र या अवॉर्डनंतर अलाया ट्रोल झाली आहे.

अवॉर्ड मिळाल्यानंतर अलायाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. यानंतर मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अलायाने शेअर केलेल्या फोटोत तिने ट्रॉफी हातात पकडल्याचं दिसतंय. ” ही माझी आहे. बेस्ट डेब्यू फिमेल. मी एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत हसतेय. मी खूप आभारी आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी तुमची आभारी आहे.” असं कॅप्शन देत तिने चाहत्यांते आभार मानले आहेत. अलायाच्या या फोटोवर काही सेलिब्रिटींनी कमेंट देत तिचं अभिनंदन केलं आहे.

तर काही वेळातच अलायाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती ट्रॉफी घेऊन आनंदाच्या भरात नाचताना दिसतेय.”मी किती खुश आहे तुम्हाला सांगू शकत नाही. भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचे आभार” असं कॅप्श तिने या व्हिडीओला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

अलायाला या पोस्ट मात्र महागात पडल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टवर तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. अनेक युजर्सनी अलाया प्रश्न विचारला आहे. “किती पैसे दिले अवॉर्डसाठई”, ” किती रुपयांमध्ये अवॉर्ड खरेदी केलं.” अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

तर अनेकांनीनी नेपोटिझमवरून तिला ट्रोल केलं आहे. एका युजरने “नेपोटिझम रॉक्स अशी कमेंट तिला दिली आहे.अनेक युजर्सनी अलायाची तुलना अनन्या पांडेसोबत केली आहे. मागच्या वर्षी अनन्या पांडेला पदार्पणासाठी हा अवॉर्ड मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

त्यानंतर यंदा अलायाला अवॉर्ड मिळाल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एका युजरने म्हंटंल आहे, “प्लिज अनन्या पांडेसारखी वागू नको.” तर एकाने म्हंटलं आहे. ” अनन्या पांडेसारख अवॉर्ड ट्रॉफी घेऊन झोपू नको.” गेल्या वर्षी अनन्या पांडेला हा अवॉर्ड मिळाल्यानंतरही तिला ट्रोल व्हावं लागलं होतं.

अलाया फर्निचरवाला ही बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे. त्यामुळेच नेपोटिझमच्या मुद्द्यावरुनही तिला ट्रोल व्हावं लागलं.