12 December 2017

News Flash

अमेरिकन गायिका बेयोंसेने दिला जुळ्यांना जन्म

बेयोंसेने फेब्रुवारीमध्ये इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत गरोदर असल्याची घोषणा केली होती.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 1:49 PM

बेयोंसे

अमेरिकन प्रसिद्ध पॉपस्टार बेयोंसेने जुळ्यां मुलांना जन्म दिल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील माध्यमांनीच ही बातमी समोर आणली आहे. ‘पीपुल्स डॉट कॉंम’ वेबसाइटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बेयोंसे आणि तिचा पती जे खूप उत्साहित आणि खूष आहेत. आपले कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांसोबत ते जुळ्यांच्या जन्माचा आनंद साजरा करत आहेत.’

बेयोंसेने सुप्रसिद्ध रॅपर जे झेडसोबत लग्न केलं. या दोघांना पाच वर्षांची एक मुलगीदेखील आहे. ब्लू आयवी असं त्या मुलीचं नाव आहे. अद्याप बेयोंसे आणि जे झेडकडून जुळ्यांच्या जन्मासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा नाही झालीये. जन्माची तारीख आणि दोन्ही मुलगे आहेत की मुली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तरी १५ जून रोजी बेयोंसेने जुळ्यांना जन्म दिल्याचे म्हटले जातेय. जे झेडला न्यूयॉर्कमध्ये ‘साँग राइट्स हॉल ऑफ फेम’ पुरस्कार दिला जाणार होता मात्र तो या पुरस्कार सोहळ्याला पोहोचू शकला नव्हता.

A post shared by Beyoncé (@beyonce) on

A post shared by Beyoncé (@beyonce) on

A post shared by Beyoncé (@beyonce) on

A post shared by Beyoncé (@beyonce) on

वाचा : शबिना सलमानला आपल्या तालावर नाचवते तेव्हा…

बेयोंसेने फेब्रुवारीमध्ये इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत गरोदर असल्याची घोषणा केली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले होते. तिने केलेल्या या घोषणेला २४ तासांत ८० लाख लाईक्स मिळाले होते आणि त्याच्या दोन आठवड्यांनंतरच तिने लॉस एंजिलिसमधील ग्रामी पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म केलं होतं. नुकतंच ‘फोर्ब्ज’ने जगभरातील १०० सर्वांत श्रीमंत कलाकारांची यादी जाहीर केली होती. या यादीत बेयोंसेला दुसरे स्थान मिळाले होते.

First Published on June 19, 2017 1:49 pm

Web Title: american singer beyonce gives birth to twins