News Flash

वयाने मोठी आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकाला डेट करण्याबद्दल अर्जुन म्हणाला…

बऱ्याचदा अर्जुनला त्याच्या रिलेशनशीपमुळे ट्रोल केले जाते.

सध्याचे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे ओळखले जातात. ते सतत एकत्र डिनर डेटला जाताना, सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. मलायका ही अभिनेता अरबाज खानची पत्नी होती. २०१७मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अर्जुन मलायकाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. २०१९मध्ये अर्जुनने मलायकाला डेट करत असल्याची कबुली दिली. पण बऱ्याच वेळा अर्जुन खासगी आयुष्यावर बोलणे टाळतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याला ‘त्याच्या पेक्षा वयाने मोठी आणि एका मुलाची आई असलेल्या मलायकासोबत रिलेशनमध्ये येताना काय विचार केला होतास?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. ‘मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही चर्चा करीत नाही कारण मला असे वाटते की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाचा भूतकाळ हा असतोच’ असे अर्जुन म्हणाला.

आणखी वाचा: ‘श्रीदेवीला घर तोडणारी म्हणत होता, आता स्वत:ने..’ मलायकाला डेट केल्यामुळे अर्जुन झाला होता ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

पुढे तो म्हणाला, ‘मी आमच्या दोघांमध्ये एक आदरयुक्त सीमा ठेवली आहे. मलायकाला ज्या गोष्टींमुळे आनंद मिळेल अशा गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या रिलेशनशीपचा माझ्या करिअरवर परिणाम होऊ देणार नाही. मी आज याबद्दल बोलत आहे कारण मी या रिलेशनशीपचा आदर करतो. आम्ही एकमेंकाना वेळ देत आहोत.’

मलायका आणि अभिनेता अरबाज खानने २०१७मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे. आता मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 12:59 pm

Web Title: arjun kapoor subtly shuts the gossip of him dating someone older with a son avb 95
Next Stories
1 “करीना, करिश्मा, अमृता आणि माझ्यात ही गोष्ट सारखी आहे…”, मलायकाने केला खुलासा
2 आदित्य देणार सईला खास सरप्राईज, ‘माझा होशील ना’मध्ये रंजक वळण
3 ‘अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर..’, इंडियन आयडलमधील ‘त्या’ वादावर अभिजीत सांवतची प्रतिक्रिया
Just Now!
X