राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. हल्लीच चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर हा ‘भोंगा’ चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मापेक्षा मोठं कोणी नाही मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती अशा या समस्यांना दुजोराच असल्याने बऱ्याचदा काही अनपेक्षित घटना डोळ्यासमोर घडताना दिसतात. असाच आशयघन विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
nach ga ghuma teaser launch mukta barve and namrata sambherao
नम्रता संभेराव अन् मुक्ता बर्वेची अनोखी जुगलबंदी! ‘नाच गं घुमा’चा टीझर प्रदर्शित, छोट्या मायराने वेधलं लक्ष
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली. तर ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत.

‘भोंगा’ चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. या आजाराला उच्च ध्वनीचा त्रास अधिक होतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन बाळाचा त्रास वाढतच जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव पाहतो, आणि हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न गावकऱ्यांकडून आणि बाळाच्या घरातल्यांकडून केले जातात हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट येत्या २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.