News Flash

जान सानूने मर्जीविरोधात किस केले प्रकरणावर निक्कीचे स्पष्टीकरण

मुलीच्या मर्जीविरोधात तिचं चुंबन घेणं चुकीचं असतं असे निक्की म्हणाली होती.

अभिनेत्री निक्की तांबोळी छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’मध्ये दिसत होती. निक्कीची घरातील वागणूक, वादग्रस्त वक्तव्य यामुळे ती सतत चर्चेत होती. निक्की आणि घरातील स्पर्धक जान सानू यांच्या विषयी सोशल मीडियावर कायम चर्चा सुरु होत्या. एकदा तर निक्कीने बिग बॉसच्या घरात टास्क दरम्यान माझ्या मर्जीविरोधात त्याने किस केलं असा आरोप जानवर केला होता. आता निक्कीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

निक्की आणि जान ही जोडी प्रेक्षकांना पाहायला प्रचंड आवडत होती. पण काही दिवसांनंतर त्यांच्यामध्ये भांडणे सुरु झाली होती. नुकतीच निक्कीने स्पॉटबॉयला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जानवर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jaan Kumar Sanu (@jaan.kumar.sanu)

आणखी वाचा : ‘मुलाचे नाव काय ठेवले?’ सैफ म्हणाला…

‘बिग बॉसच्या घरात आम्ही चांगले मित्र होतो. आणि मैत्रीमध्ये मिठी मारणे किस करणे हे चालते. पण मध्येच आमची भाडंणे झाली होती कारण जानने मला नॉमिनेट केले आणि मी अपसेट झाले. त्यानंतर त्याने माझी चूक झाली, मला माफ कर असे म्हणत माझी माफी मागितली. पण मला त्याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळे मी त्याची माफी स्वीकारली नाही. त्यावेळी आमच्यामध्ये सुरु असेल्या संभाषणामध्ये मी त्याला तू जे मला किस करतोस ते करु नकोस असे म्हणाले. तो माझ्या मर्जीविरुद्ध किस करत आहे असे अजीबात म्हणाले नव्हते’ असे निक्की म्हणाली.

आणखी वाचा : नवरा माझा हवा तसा… ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींनी केला इंडस्ट्रीबाहेरील नवरा

पुढे ती म्हणाली, ‘पण जानने नॅशनल टीव्हीवर बोलताना ते चुकीच्या पद्धतीने म्हटले. तो आधी सर्वांसमोर मला किस करत होता. म आता मी सर्वांसमोरच किस करु नकोस असेच बोलणार ना.’

बिग बॉसच्या घरात काय म्हणाली होती निक्की?

बिग बॉसने दिलेल्या टास्कदरम्यान घरातील प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या दोन प्रतिस्पर्ध्यांची नावं तुरुंगात टाकण्यासाठी नॉमिनेट करायची होती. या टास्कदरम्यान निक्कीने जानचं नाव घेतलं. जान सानूवर आरोप करत ती म्हणाली, “मुलीच्या मर्जीविरोधात तिचं चुंबन घेणं चुकीचं असतं. यासाठी तुला तुरुंगात जावंच लागेल.” कॅप्टन बनलेल्या अली गोनीनेही निक्कीची साथ दिली होती. त्यानेसुद्धा जानला खडेबोल सुनावले. त्यानंतर जानने, “जर मी तिच्या मर्जीविरुद्ध चुंबन घेतलं, तर मग तिने पुन्हा मला का चुंबन दिलं” असा प्रश्न विचारला. या प्रकरणावरून निक्की आणि जान सानू यांच्यात चांगलाच वाद रंगला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 6:13 pm

Web Title: bigg boss 14 nikki tamboli clarifies her allegation on jaan kumar for forcefully kissing her avb 95
Next Stories
1 विकी कौशल करणार मानुषीसोबत रोमान्स; लवकरच दिसणार एकत्र
2 रस्त्यावर जुस विकताना दिसला सुनील ग्रोव्हर, व्हिडीओ व्हायरल
3 आलियाने दिली आणखी एक गुड न्यूज, शाहरुखसोबत ‘डार्लिंगस्’ सिनेमाची निर्मिती
Just Now!
X