News Flash

Bigg Boss Marathi 2 : सगळे सदस्य होणार का नॉमिनेट?

कोणावर चिडले अभिजीत बिचुकले?

'बिग बॉस मराठी २'

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरु आहे. ज्यावरून घरात बरेच वाददेखील झाले. मैथिली नेहावर खूप चिडली कारण, नेहाने दिलेले कारण मैथिलीला अजिबात पटले नाही. मैथिलीने नेहाला कॅप्टनसी मिळावी म्हणून वोट दिले होते, जेव्हा हे मैथिलीने नेहाला सांगितले तेव्हा नेहा म्हणाली मला कुणावरही विश्वास नाही. नेहाच्या या वक्तव्यावर मैथिलीने नाराजगी व्यक्त केली. या टास्कमध्ये पराग, वीणा, माधव हे नॉमिनेट झाले. या टास्कवरूनच बिग बॉसने हे जाहीर केले की, जर सदस्यांनी कुणाला नॉमिनेट केलं नाही तर बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करेल. आता काय पुढे काय होईल? सर्व सदस्य नॉमिनेट होतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इतकंच नसून शिवानी, शिव आणि दिगंबर यांनी मिळून बिचुकले यांची थोडीशी गंमत करण्याचे ठरवले. अभिजीत बिचुकले बाथरूममध्ये असताना त्यांनी लाइटचा खेळ केला त्यामुळे ते खुप वैतागले. पण यानंतर त्यांचा राग अजूनच वाढला. कारण, पोपटचा पिंजरा या टास्कमध्ये बिचुकलेनं परागला नॉमिनेट केलं आणि त्यामुळे पराग त्यांना वारंवार चिडवताना दिसणार आहे की, “साताऱ्यामध्ये परतीचे पेढे तयार ठेवा” आता या वाक्यामुळे अभिजीत बिचुकले यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पराग यांना खडसावले या घरात कोण जाणार कोण जाणार ते तुम्ही नका ठरवू. आता या भांडणाचं पुढे काय होईल? ते पुढील भागात पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 3:52 pm

Web Title: bigg boss marathi 2 will all contestants get nominated this week
Next Stories
1 ‘भारत’ सोडून प्रियांकाने घेतला धाडसी निर्णय- सलमान
2 दत्तगुरुंचा महिमा सांगणारी पौराणिक मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’
3 ‘जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी घ्यावं लागायचं स्टेरॉइड ‘
Just Now!
X