बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोचा प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. घरातील वाद असो किंवा बिग बॉसने दिलेले टास्क, स्पर्धकांची धमाल मस्ती पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर असतात. मंगळवारी स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला. मेघा धाडेची लावणी, रेशम आणि स्मिताचा धमाकेदार डान्स, आस्ताद काळे आणि प्रसेनजीत कोसंबीचे गाणे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात रंगणार आहे चोर- पोलीसचा खेळ. या खेळात कोण विजयी ठरणार, घराचा नवा कॅप्टन कोण ठरणार, घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लहानपणीचा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे चोर-पोलीस. लहानपणीचा हा उत्कंठावर्धक खेळ गंमत म्हणून खेळला गेला असला तरी आता या घरामध्ये मात्र कॅप्टन्सी, लक्झरी बजेट यासाठी होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या खेळामधील स्पर्धकांचं पुढील अस्तित्व ठरवणार आहे. त्यामुळे सगळ्यांची चोर- पोलीस खेळण्याची तयारी सुरु झाली आहे. गोष्टी लपवणे, गोष्टी अश्या ठिकाणी लपवणे जिथून त्या कोणाला मिळणार नाहीत. खेळ खेळताना कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कुठल्या गोष्टी करू नये, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी या बाबतचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

अॅमेझॉन कर्मचाऱ्यापासून ते ३००० कोटींच्या संपत्तीचा मालक, जाणून घ्या सोनमच्या ‘आनंद’बद्दल

या खेळात कोणता संघ बाजी मारणार ? कोण नॉमिनेट होणार हे पाहणं आजच्या भागात औत्सुक्याचं ठरणार आहे.