– उदय गंगाधर सप्रे

काल आपण पाहिलं की १९४९ मध्ये मधुबालाने सोळावं वर्ष कसं मोक्याचं असतं हे सिद्ध करून दाखवलं. १६ व्या वर्षातील तिच्या ९ पैकी ८ सिनेमांबद्दल आपण थोडं फार जाणून घेतलं. राहिलेल्या एका सिनेमाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा सिनेमा म्हणजे बॉम्बे टॉकीजचा ‘महल’. या सिनेमाची निर्मिती इतकी रोचक आणि गूढ आहे की त्यावर पण एक दास्तान-ए-महल नावाचा वेगळा सिनेमा होऊ शकेल. सगळ्यात आधी आपण ‘महल’ सिनेमाची पटकथा कशी तयार झाली ते पाहूया…काल आपण पाहिलं की १९४९ मध्ये मधुबालाने सोळावं वर्ष कसं मोक्याचं असतं हे सिद्ध करून दाखवलं. १६ व्या वर्षातील तिच्या ९ पैकी ८ सिनेमांबद्दल आपण थोडं फार जाणून घेतलं. राहिलेल्या एका सिनेमाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा सिनेमा म्हणजे बॉम्बे टॉकीजचा ‘महल’. या सिनेमाची निर्मिती इतकी रोचक आणि गूढ आहे की त्यावर पण एक दास्तान-ए-महल नावाचा वेगळा सिनेमा होऊ शकेल. सगळ्यात आधी आपण ‘महल’ सिनेमाची पटकथा कशी तयार झाली ते पाहूया…

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
Loksatta explained North Korea also has a destructive hypersonic missile
उत्तर कोरियाच्या हाती लवकरच विध्वंसक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र… पण या छोट्या, मागास देशाकडे हे तंत्रज्ञान आले कसे?

दास्तान-ए-मधुबाला भाग- ३

उत्तर प्रदेशात जन्मलेला एक धडपड्या तरूण कवी व लेखक १९३८ मधे लाहोरला शिक्षण सोडून रोजगाराच्या शोधात होता. त्याचं नाव सैय्यद अमीर हैदर कमाल नक्वी. सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांची व त्याची कर्मधर्म संयोगाने गाठ पडली आणि ते सय्यदला मुंबईला घेऊन आले. हिंदी व उर्दूवर प्रभूत्व असलेल्या सय्यदने सोहराब मोदींच्या मिनर्व्हा मूव्हिटोनसाठी काम करायला सुरुवात केली. १९३८ मध्ये ‘जेलर’, १९३९ मध्ये ‘पुकार’, आणि १९४० मध्ये ‘भरौसा’ अशा सिनेमांच्या पटकथा आणि संवाद त्याने लिहिले. यास सिनेमांमुळे हळूहळू सय्यदचं नाव मोठं होत गेलं. ए.आर. कारदारची ‘शाहजहान’ पण सय्यदने लिहिली आणि त्याला दक्षिणेकडून बरीच मागणी येऊ लागली. अशाच एका दक्षिणेतील कामासाठी जाताना सय्यदनं वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. उत्तरेकडील गावातील एक सात- आठ वर्षांची गरीब कुटुंबातील मुलगी अचानक पूर्वजन्मीच्या गोष्टी सांगू लागली आहे. पूर्वजन्मात इजिप्तमधल्या एका श्रीमंत घरात आपण वाढत होतो आणि अकस्मात् ताप येऊन आपला मृत्यू झाल्याचं ती सांगते होती. कैरोमधील एका घराचा पत्ता, त्यातील कौटुंबिक सदस्यांची माहितीही तिने घडाघडा सांगितली. त्याकाळी एकतर स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते आणि एवढ्या गरीबीतील मुलीकडे व कुटुंबाकडे कोण लक्ष देणार होतं यामुळे या बातमीची शहानिशा काही पुढे झाली नाही.

आपलं बंगलुळू आणि म्हैसूरमधलं काम आटपून सय्यद खाजगी गाडीने मुंबईला परतत असताना त्याने वाटेत एखाद्या डाक बंगल्यात मुक्काम करायचं. जेवण व्हायला वेळ होता म्हणून सय्यदनं चहा मागवला. थोड्याच वेळात एका हातात कंदील व एका हातात चहा- बिस्किटांचा ट्रे घेऊन तोंडावर पदर घेऊन एक तरूणी खोलीत आली. मिट्ट अंधारात व रात्रीच्या किर्र शांततेत नाजूक पैंजणांचा आवाज करत ती आली… तिनं चहा टेबलवर ठेवला. तिच्या गोर्‍यापान हातांकडे लक्ष जाताच सय्यदला सर्वांग झाकणार्‍या तिच्या कपड्यातूनही तिचा कमनीय बांधा जाणवला. गूढशा शांत वातावरणात तरणाबांड सय्यद व ती सौंदर्यवती… अगदी हिंदी सिनेमातील प्रसंग… सय्यदनं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण काहीही न बोलता ती निघून गेली. जेवण झाल्यावर घनदाट जंगलातील एकांतातील त्या बंगल्यात रातकिड्यांच्या किरकिरीसोबत जंगली श्वापदांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर सय्यदच्या कानातून तिच्या पैंजणांची रुमझुम, हातच्या कंकणांची किणकिण आणि ती कमनीय स्त्री नजरेसमोरून जाईना. याच गूढ हुरहुरीत त्याला गाढ झोप लागून गेली.सकाळी सगळं आटपून निघण्यासाठी तयार होऊन सय्यद सहज खिडकीशी गेला असता त्याला कालची ती तरुणी परत दिसली. अनावृत्त चेहेर्‍याची सुंदर स्त्री पाहून सय्यद हळहळला. तोच तिने चेहेर्‍यावर घूँघट ओढून घेतला व ती चहा- नाश्ता घेऊन आली. याहीवेळी सय्यदचा बोलण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. निघताना चौकीदाराला पैसे देताना त्यानं त्या मुलीची सहज चौकशी केली. तेव्हा त्याला त्या मूक पदरामागची विदारक हकीगत समजली.

दास्तान-ए-मधुबाला भाग- २

ती त्या चौकीदाराची सून होती. काही महिन्यांपूर्वीच तिचा नवरा कसल्याशा तापाने आजारी पडला व औषधोपचार सुरु असतानाच मरण पावला. या दु:खाची खपली अजून निघाली नव्हती व ती विधवा स्त्री आणि तिचे सासू सासरे अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. अत्यंत विमनस्क मनः स्थितीत सय्यद तिथून बाहेर पडला आणि मुंबईच्या परतीच्या प्रवासाला लागला. संवेदनशील मनाच्या सय्यदने वर्तमानपत्रातली ती पूर्वजन्मातील हकीगत सांगणारी मुलगी व डाक बंगल्यातील सुंदरी यांची सांगड घालत मनातल्या मनात एक पटकथा योजायला सुरुवात केली. मुंबईला आल्यावर आधी ती पटकथा लिहून काढली. ती पटकथा नायकाच्या मृत्यूवर संपते. हीच होती महलची पटकथा.ही शोकांत पटकथा घेऊन सय्यद हा ख्वाजा अहमद ऊर्फ के.ए. अब्बास या त्याच्या मित्राकडे घेऊन गेला. अब्बास अनेक वर्षांपासून त्याच्या बॉम्बे टॉकीजसाठी काही तरी लिहिण्यासाठी मागे लागला होता. यापूर्वी सय्यदनं लिहिलेली ‘मुसाफिर’ची कथा संचालकांना पसंत पडूनही त्यावर सिनेमा निघाला नव्हता. पण आता ही गूढकथा घेऊन अब्बासकडे जाताच त्याला घेऊन अब्बास बॉम्बे टॉकीजमधे गेले.

सल्लागार समितीने ‘महल’ची कथा पसंतीचं शिक्कामोर्तब करताच सय्यदनं सिनेमाची संपूर्ण पटकथा व अनुरूप संवाद लिहून काढले. पण नंतर  बॉम्बे टॉकीजचं संचालक मंडळ व सल्लागार यांच्यात कथेच्या रहस्यमय साच्यावरून वाद सुरु झाले. पाच वर्षांपूर्वी बॉम्बे टॉकीजने बनवलेला ‘प्रतिमा’ हा रहस्यमय सिनेमा पहिल्याच आठवड्यात कोसळला होता. त्यामुळे संचालक मंडळाने सय्यदला कथेला कौटुंबिक स्वरुप द्यायला सांगितलं.प ण सय्यदला आपल्या कलाकृतीवर पूर्ण भरवसा होता. त्यात रहस्यापेक्षाही अधिक गूढरम्यता असल्याची खात्री असल्याने त्याने कथा बदलण्यास स्पष्ट विरोध केला. तेव्हा संचालक मंडळाने अशा किचकट कथेसाठी नेहेमीच्या दिग्दर्शकांपैकी कुणीही तयार नसल्याचं कारण पुढे केलं. मूळचाच हरहुन्नरी सय्यद, त्याने ही संधी अचूक उचलत स्वत:च दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली. पण सय्यदला आधी दिग्दर्शन कामाचा अनुभव नसल्याने ते धोक्याचं असल्याचं संचालकांपैकी एकजण म्हणाला.

madhuba

तेव्हा सय्यद उसळला आणि म्हणाला, ‘नोकरी नाही म्हणून अनुभव नाही व अनुभव नाही म्हणून नोकरी नाही असंच झालं हे साहेब.’ कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मी जाणतो. पण मग तुम्ही बाहेरगावी असलेल्या अशोक कुमार साहेबांशी फोनवर बोलून घ्या. यावर संचालकांपैकी एक संचालत सावक वाच्छा यांनी अशोक कुमार येईपर्यंत निर्णय स्थगित असल्याचं सांगताच सय्यद वैतागून म्हणाला , ठीक आहे, मी आत्ताच कथा घेऊन सोहराब मोदींकडे जातो. अशा तयार गूढरम्य कथेवर सिनेमा बनवण्याची संधी ते नक्कीच सोडणार नाहीत. हे ऐकल्यावर मात्र संचालकांनी सय्यदला थांबवत अशोक कुमारला ट्रंक कॉल लावला व संपूर्ण परिस्थितीची कल्पना देत सल्ला विचारला. संचालक मंडळापैकीच एक असलेल्या अशोक कुमारच्या मताला खूप मान व महत्व होतं. सगळं ऐकून घेतल्यावर अशोक कुमार यांनी सय्यदच्या बाजूने कौल दिला. अशा प्रकारे सय्यद हा कथा- पटकथा- संवाद- दिग्दर्शन अशा ४ महत्वाच्या कामगिरीसाठी सिद्ध झाला. सिनेमाचं नाव ‘महल’ असं त्यानं जाहीर केलं.

दास्तान-ए-मधुबाला भाग- १

बॉम्बे टॉकीजचा सिनेमा म्हटल्यावर संचालकांपैकी एक असलेला ३७ ३८ वर्षे वयाचा जूना असला तरी नायक अशोक कुमारच असणार हे ठरलेलंच होतं. नायकाच्या सिनेमातील बायकोच्या दुय्यम भूमिकेसाठी विजयालक्ष्मी नामक नटीची निवड झाली. नायिका म्हणून सावक वाच्छांनी सुंदर सुरैय्याची निवड केली व फार तर ₹ ४०,००० मानधन कबूल केलं. त्यावेळी चलतीमधे असलेल्या सुरैय्याने एवढ्या पैशात गाणी म्हणणं परवडणारं नसल्याचं सांगितलं व ते वाच्छांनी मान्य केलं व सुरैय्याला संपूर्ण मानधनाची रक्कम रोख देऊनही टाकली. सिनेमातील इतर दुय्यम भूमिकांसाठी कलाकारांची पण निवड संचालक मंडळाने करून टाकली.इकडे सय्यदने ‘महल’ची लावण्यवती नायिका म्हणून डोळ्यांसमोर १५ वर्षांची कोवळी सुकुमार मधुबाला योजून ठेवलेली. पण सुरैय्याची बातमी कानावर पडताच तो सटपटलाच व त्याने सुरैय्याची निवडच रद्द केली.

सावक वाच्छांना अगदी परखडपणे त्याने सुनावलं. संचालक मंडळापैकी एक म्हणून अशोक कुमार नायक हे विधिलिखित. इतर भूमिकांसाठी पण तुमची निवड मान्य पण नायिकेची निवड मीच करणार आणि यासाठी एकदम तरतरीत मधुबालाच योग्य याची मला खात्री आहे असं म्हणून त्यानं निरनिराळ्या मासिकांतून आलेले मधुबालाचे डझनावारी फोटो सावकना दाखवले. ते पाहून सावकही प्रभावित झाले. पण त्यांनी ४०,००० रुपये सुरैय्याला दिल्याचा व मधुबालाचा बाप लालची असल्याने व ती डिमांडमधे असल्याने भारंभार मानधन ती मागेल असे २ मुद्दे मांडले. जिद्दी सय्यदनं संपूर्ण गृहपाठ करूनच रिंगणात उडी घेतलेली. तो म्हणाला  दिलेली रक्कम सुरैय्या परत करणार नसेल तर पाणी सोडा त्या रकमेवर. ‘मी माझं मानधन कमी करतो. राहता राहिला मधुबालाच्या मानधनाचा प्रश्न तर ५०,००० रुपये मधुबालाचं मानधन मागणार्‍या अताउल्लाखानला मी याच भाषेत सांगून आलोय की टॉपचा हिरो, टॉप कथा व सुरैय्याला संपूर्ण रक्कम पोचती झाली आहे. तू मधुबालासाठी ३५,००० रुपये मानधन मान्य करशील तर करार करु, नाही तर सुरैय्या आहेच तयार. त्यामुळे मधुबालासाठी ३५,००० रुपयांमध्ये खान एका पायावर तयार झाला.’ एवढ सगळं ऐकल्यावर बोलणंच खुंटलं.

मधुबालाची स्क्रीन टेस्ट करायची ठरलं. जोसेफ नावाच्या इंडोजर्मन कॅमेरामननं चार- पाच तास खपून मधुबालाचे वेगवेगळ्या कपड्यातले व मेकअपमधील डझनावारी अँगलमधले फोटोशूट केलं व ते सारं एका फिल्ममधे परिवर्तीत केलं. प्रोजेक्शन रूममधे जेव्हा सय्यदसह सगळ्या संचालकांनी ती स्क्रीन टेस्ट मोठ्या स्क्रीनवर पाहिली तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला. मधुबाला फारच सामान्य दिसत होती. सावक वाच्छांनी कुत्सित शब्दांत सय्यदची हेटाळणी केली तेव्हा सय्यदने त्यांच्याकडे एक दिवसाची मुदत मागितली. सय्यदनं मधुबालाच्या स्क्रीन टेस्टच्यावेळी हजर असलेले लाइट बॉईज, स्पॉट बॉईज आणि असिस्टंट कॅमेरामन यांना जवळच्याच एका इराणी हॉटेलात भरपेट खाऊ पिऊ घालून आतली गोष्ट जाणून घेतली. मेकअप मॅनने मधुबालाचा खराब मेकअप करावा, लाइट बॉईजनी तिचा चेहेरा चित्रविचित्र दिसेल असा लाइट इफेक्ट द्यावा व कॅमेरामनने फोटो नीट येऊ न द्यावेत अशा सूचना त्यांना वरून देण्यात आल्या होत्या.

कर्मधर्मसंयोगाने दुसर्‍याच दिवशी कलकत्त्याहून अशोककुमार परतला व सय्यदने हे सगळं त्यांना कथन केलं. १९४२ मध्ये ‘बंधन’च्या शेजारीच झालेला ‘बसंत’च्या शूटिंगनंतरचा लहानपणच्या बेबी मुमताज ऊर्फ मधुबालाच्या कौतुकाचा प्रसंग अशोककुमारच्या नजरेसमोर तरळून गेला व त्यानेही सय्यदला पाठिंबा देत स्वत:च्या देखरेखीखाली मधुबालाची परत स्क्रीन टेस्ट करवून घेतली व परत ते रिझल्टस् मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. एक अप्रतिम लावण्य पडद्यावर अवतरलं होतं. जे अवतरण्याआधीच काळवंडावं अशी पराकाष्ठा करण्यात आली होती. अशोककुमारनी फक्त प्रश्नार्थक मुद्रेने संचालक मंडळातील सदस्यांकडे पाहिलं व सय्यदने थेट सावक वाच्छांच्या डोळ्याला डोळा भिडवला. एकही अक्षर न बोलता सेवक वाच्छा निघून गेले आणि अशा प्रकारे मधुबाला महलची नायिका झाली.

महल फ्लोअरवर आला, तळ्यातील व आणखी काही तुरळक सीन्स वगळता सगळं शूटिंग इनडोअर करण्यात आलं. १५ वर्षांची सुकुमार मधुबाला धिटाईने अवगुंठनातील रोल साकारत होती. २२ वर्षांनी मोठा नायक अशोक कुमार  कथेला न्याय देत होता. शूटिंग सुरु होतं. नायिकेच्या तोंडचं गाणं गाण्यासाठी पातळ फिरत असणारा आवाज हवा होता. संगीतकार म्हणून सय्यदला नौशाद हवे होते, पण कंपनीचा पगारी संगीतकार खेमचंद प्रकाश असताना ते शक्य नव्हतं. मधुबालाच्या तोंडचं गाणं नक्शबकडून लिहून झालं व सय्यदनं खेमचंदला अंदाजची लताच्या आवाजातील गाणी ऐकवली आणि खेमचंदने सय्यदच्या निवडीची दाद दिली. लता मंगेशकर नावाचं अभेद्य कोंदण ‘आएगा आनेवाला’ गाण्याला सापडलं. गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं आणि नंतर काही सीन्स शूट केल्यावर सिनेमा पूर्ण झाला. तोवर मधुबाला १६ वर्षांची झाली होती.

कधीकधी आसपासचं मर्यादीत तंत्रज्ञान पण पथ्यावर पडतं. आता हेच बघा ना गूढमय सिनेमा. पण तो तंत्रज्ञानाअभावी रंगीत नसून ब्लॅक अॅण्ड व्हाईट असणार होता. लावण्यवती मधुबालाच्या हे पथ्यावरच पडलं. नवनवीन केशसंभार व नवनवीन कपडे व दागिन्यांनी नटण्या मुरडण्याच्या १६ व्या वर्षात मधुबाला काय करत होती? तर गूढमय भूमिका, कौमार्य प्राप्त झालेली मधुबाला लाजून चूर होण्याच्या वयात वखवखलेल्या परक्या अपरिचित नजरांच्या सिनेमासृष्टीत गूढमय रोलमधे कॅमेर्‍यासमोर वावरत होती. तेही सुमारे वर्षभर. ‘महल’ची कथा व झरझर बदलणारे प्रसंग लोकांनी श्वास रोखून पाहिले. मेणबत्तीचा उजेड चेहेर्‍यावर पडलेली नायिका काळोखातून सावकाश पायर्‍या उतरून जात असते. पहिल्या क्लोजअपमधे मधुबालाला पाहिलं आणि प्रेक्षक खुळावले. नंतर सिनेमाभर कथा पुढे सरकते पण मधुबालाचं गारुड मनावरून उतरत नाही. थोराड अशोक कुमार व इतर पात्रं दुय्यम ठरतात. अशोक कुमार या तोडीच्या अभिनेत्यासमोर झोकून देऊन मधुबालानं काम केलं. संपूर्ण ‘महल’ सिनेमा मधुबालानं आपल्या अस्तित्वानं व अभिनयानं व्याप्त करून टाकला. पण मधुबालाचं सौंदर्यच तिला मारक ठरलं.

तिच्या सौदर्याच्या चांदव्यात तिच्या अभिनयाचं तेज कायमच दुर्लक्षित राहिलं.सिनेमातील शोकांत शेवट आवडणार नाही म्हणून सय्यदनं शेवट बदलुन पण ती रिळं तयार ठेवली होती. सुरैय्याच्या ४०,००० रुपयांसह सिनेमा  ३,४०,००० रुपयांमध्ये पूर्ण झाला होता. प्रदर्शित करण्यापूर्वी अशोक कुमारने हा सिनेमा के.ए.अब्बास, राज कपूर, दिलीप कुमार, शशधर मुखर्जी, अभिनेता जयराज, केदार शर्मा आणि आणखीन काही जाणकारांना आमंत्रित करून दाखवला. के.ए.अब्बास, राज कपूर, केदार शर्मा यांनी सिनेमाचे भरभरून कौतुक केले. पण संचालक मंडळाच्या प्रतिक्रिया मात्र उलट सुलट होत्या. त्यामुळे अशोक कुमारने ताराचंद डिस्ट्रिब्यूटर्सच्या सेठ ताराचंदना हा सिनेमा आधी न पाहताच अल्प किंमतीत घ्यावा अशी गळ घातली. यामागचं खरं कारण असं होतं, बॉम्बे टॉकीजचे ‘ज्वार भाटा’, ‘मजबूर’, ‘नतीजा’, ‘प्रतिमा’, ‘चार आँखे’ व ‘आशा’ हे सिनेमे गेल्या दोन- तीन वर्षांत अपयशी झाल्याने वितरकांना बरीच झीज सोसावी लागली होती. नंतर आलेल्या ‘मिलन’ व ‘जिद्दी’ने जरी थोडा दिलासा दिला असला तरी महलच्या यशाबाबत अशोककुमार साशंक होता. त्यामुळे वितरकांचं होणारं नुकसान भरून देण्याच्या अशोक कुमारच्या आश्वासनानंतर सेठ ताराचंदनी महलचे हक्क साडे चार लाख रुपयांना विकत घेतले.

रॉक्सीला ‘महल’ लागला तो कित्येक महिने हाऊसफुल च्या बोर्डसह न हलण्यासाठीच. सिनेमा तूफान चालला. बाबूराव पटेलच्या फिल्म इंडियाने व सिनेब्लिट्झने असा सिनेमा यापूर्वी कधीही निर्माण झाला नव्हता अशी स्तुतीसुमनं उधळली.आचार्य अत्रेंनी त्यांच्या नवयुग या साप्ताहिकात लिहिलं की, ‘असा सर्वांगसुंदर सिनेमा गेल्या शंभर वर्षात निर्माण झाला नसेल आणि इतकी लावण्यवती अप्सरा (मधुबाला) गेल्या १०० वर्षांत प्रेक्षकांना पाहायला मिळाली नसेल. या दोन्ही गोष्टी पुढील १०० वर्षांत होणार नाहीत. (यापैकी आणखीन ११ वर्षांनीच के. असीफनं मुगल-ए-आझम काढून हा रेकॉर्ड मोडला. पण मधुबाला मात्र १०० वर्षं काय तर पुढे कधीही निर्माण होणार नाही.)

‘महल’ मुळे ४ रत्नं झळाळून उठली. लेखक- दिग्दर्शक कमाल अमरोही, संगीतकार खेमचंद प्रकाश, गायिका लता मंगेशकर आणि सौंदर्यवती अभिनेत्री मधुबाला.एखादा सिनेमा हा दुसर्‍या कुठल्याही मार्गांपेक्षा माऊथ पब्लिसिटीने जास्त चालतो. ‘महल’च्या बाबतीत पण हेच झालं आणि नेमकं तेच ‘महल’साठी थोडसं मारक पण ठरलं. सेन्सॉरवाल्या काही मंडळींनी ‘महल’चं कौतुक ऐकून तो सिनेमा थिएटरमधे पाहिला व त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला तर सगळी रिळ विशेषत:  शेवट असलेली रिळ दाखवलीच गेली नाहिये. मग त्यांनी बॉम्बे टॉकीजला नोटिस पाठवली. त्यावर अमरोहीने मार्ग काढला आणि तो तिढा शांत झाला. महलने देशभरात पहिल्या महिन्यातच सिनेमावर झालेला खर्च वसूल केला व नंतर विक्रमी व्यवसाय केला. एका महलमुळे मधुबाला रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. लावण्यवती मधुबाला ही ध्रूवबाळानंतर अढळपदावर विराजमान होणारी एकमेव बाला होय.

– उदय गंगाधर सप्रे